कुजबुज... त्यांनी बजावली कर्तव्यनिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:27+5:302021-06-23T04:16:27+5:30
पोलिसांचे काम कायदा मोडणा-याला पकडणे, तसं आंदोलकाचं काम हे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेणं असतं. असाच ...
पोलिसांचे काम कायदा मोडणा-याला पकडणे, तसं आंदोलकाचं काम हे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेणं असतं. असाच एक प्रकार कोल्हापुरात घडला. सामाजिक परिस्थिती बिघडू नये म्हणून आरक्षण आंदोलनातील एका नेत्याला संबंधित पोलीस अधिका-याने घरात जाऊन सकाळीच पकडलं, पोलीस ठाण्यात आणलं. काही तास बसवून नियम व कायदा समजावून सांगून नोटीस बजावून त्यांना सोडलं. पण त्या आंदोलकांने राग, मत्सर मनात न ठेवता त्याच सायंकाळी हातात सेलिब्रेटी केक घेऊन तो पोलीस ठाण्यात आला, साहेबांचा वाढदिवस साजरा करायला... त्याच्या या कृतीबद्दल सारे पोलीसच अचंबीत झाले. येथे ज्याची त्याने कर्तव्यनिष्ठा बजावल्याचे सांगितले.
- तानाजी पोवार, कोल्हापूर