सरोळीच्या विद्याथर्यांचे विविध परीक्षेत धवल यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:42+5:302021-08-28T04:28:42+5:30
गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने दोन ते तीन किलोमीटरचा पायी प्रवास करून तुडये येथे रामलिंग हायस्कूलला माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या ...
गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने दोन ते तीन किलोमीटरचा पायी प्रवास करून तुडये येथे रामलिंग हायस्कूलला माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. वर्गशिक्षक आर. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त केले आहे, तर या अगोदरही सलग १० वर्षे विज्ञान प्रदर्शन, ४ विद्यार्थी क्रीडाप्रबोधिनीसाठी निवड, याच वर्षी पाचवी शिष्यवृत्तीतही दोन विद्यार्थ्यांची निवड, सामान्यज्ञान व कथाकथन स्पर्धेतही राज्य व राज्याबाहेर गावातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत प्रशांत मारुती पाटील, के. पी. भोगण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
मुख्याध्यापक बाबाजी कांबळे, सुरेश सावंत व उदय पाटील व शाळा समिती अध्यक्ष आनंद पाटील, सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले. या गावातील कार्वे महाविद्यालयाचे उत्तम पाटील यांचेही अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. फोटो ओळी : सरोळी (ता. चंदगड) येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बाबाजी कांबळे, प्रशांत पाटील, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २७०८२०२१-गड-०३