सत्तेत घेणारे तुम्ही कोण...?

By admin | Published: November 1, 2015 01:11 AM2015-11-01T01:11:29+5:302015-11-01T01:16:19+5:30

आमदार राजेश क्षीरसागर

Who are you in power ...? | सत्तेत घेणारे तुम्ही कोण...?

सत्तेत घेणारे तुम्ही कोण...?

Next

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेलाच बहुमत मिळणार आहे; त्यामुळे शिवसेनेला भाजपबरोबरच्या सत्तेत जाण्याची गरज नाही. सत्तेसाठी कुणाबरोबर हातमिळवणी करायची याचा निर्णय ‘मातोश्री’वर होतो, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.
क्षीरसागर म्हणाले, ‘विधानसभा असो की महापालिकेवेळी असो; युती भाजपने तोडली व ओरड शिवसेनेच्या नावाने केली आहे. विधानसभेनंतरही आमचे पालकमंत्री पाटील यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांच्याशी आजही कोणतीच दुश्मनी नाही; परंतु त्यांच्या आडून कुणी वार करीत असेल, तर ते सहन करणार नाही. उरला विषय सत्तेत जाण्याचा. सेनेलाच बहुमत मिळणार असल्याने भाजपने आम्हाला सत्तेत घेण्याचा प्रश्नच नाही.’ (प्रतिनिधी)

Web Title: Who are you in power ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.