‘मुद्रा’तून ८00 कोटींची खिरापत कुणाला? सुशिक्षित बेरोजगार वंचितच :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:23 AM2018-03-13T01:23:08+5:302018-03-13T01:23:08+5:30

सुशिक्षित बरोजगारांना स्वयंउद्योगाच्या संधी देण्यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजना मोठ्या थाटात सुरू करण्यात आली. विना तारण, विना जामीन व तेही झटपट कर्ज नवा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना,

 Who crores 800 crores from 'Mudra'? The unemployed educated unemployed: | ‘मुद्रा’तून ८00 कोटींची खिरापत कुणाला? सुशिक्षित बेरोजगार वंचितच :

‘मुद्रा’तून ८00 कोटींची खिरापत कुणाला? सुशिक्षित बेरोजगार वंचितच :

Next
ठळक मुद्दे‘नवे-जुने’ करण्यावर भर देत बॅँकांनी कागदोपत्री केले टार्गेट पूर्ण


सुशिक्षित बरोजगारांना स्वयंउद्योगाच्या संधी देण्यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजना मोठ्या थाटात सुरू करण्यात आली. विना तारण, विना जामीन व तेही झटपट कर्ज नवा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना, व्यवसाय विस्तार करणाºयांना दिले जाते, अशा जाहिरातीद्वारे योजनेचा मोठा गवगवा करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीचे वास्तव मात्र वेगळे आहे. खरंच बेरोजगार, नवउद्योजकांना कर्ज मिळाले काय? विना तारण व झटपट कर्ज दिले गेले काय? तरुणांच्या कर्जासंबधी कागदपत्राच्या तक्रारी काय आहेत या साºयांचा ऊहापोह करणारी मालिका आजपासून...

समीर देशपांडे ।

कोल्हापूर : ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेखाली कर्ज घ्या आणि आपल्या उद्योग, व्यवसायाचे स्वप्न साकार करा’ अशी जरी जाहिरात केली गेली असली, तरी ‘नवे-जुने’ करूनच कोेल्हापूर जिल्ह्याने कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राज्यात कोल्हापूरने मुद्रा कर्ज वितरणात पाचवा क्रमांक पटकावला असला तरी खरोखरच बेरोजगारांना यातील किती कर्ज मिळाले तसेच वर्षभरात ८00 कोटी रुपयांचे कर्ज नेमके कुणाला वाटले याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
दोन वर्षांपूर्वी ही योजना वाजत-गाजत सुरू करण्यात आली. मात्र, खºया अर्थाने २०१७/१८ मध्येच ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी इचलकरंजी येथे आणि १९ जानेवारी २०१८ रोजी शिवाजी स्टेडियमवर मेगा मेळावा घेऊन या योजनेचे ढोल वाजविण्यात आले. सुमारे २५ हजार युवक-युवतींनी या मेळाव्याला भेट दिल्याचे सांगण्यात आले. १५ हजारांपेक्षा अधिक अर्जही दिले गेले. मात्र, प्रत्यक्षात किती जणांना कर्ज मिळाले हा संशोधनाचा विषय आहे. या मेळाव्याला उपस्थित राहून अनेकांनी आता आमचे फॉर्म भरले त्याच्या पोहोचही दिलेल्या नाहीत आणि आता बँकेत गेले की पोहोच मागतात, अशा तक्रारी सुरू केल्या आहेत.

तारण नाही, जामीन नाही
‘तारणही नाही आणि जामीनही नाही’ अशी ही कर्ज योजना जाहीर केली गेल्याने हजारो जणांनी या योजनेतून कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली. ‘घरगुती व्यवसाय किंवा कुटिरोद्योग सुरू करण्यासाठी सवलतीच्या दराने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा,’ अशीही जाहिरात करण्यात आली. मात्र, ९ ते १२ टक्क्यांनी विविध बँका यासाठी कर्ज व्याजदर आकारात आहेत हे वास्तव आहे. यातून १0 ते १५ हजारांपर्यंत शिशु कर्ज दिले जाते. ५0 हजार ते ५ लाखांपर्यंत किशोर, तर ५ लाख १0 लाखांपर्यंत तरुण गटातून कर्ज दिले जाते. (क्रमश:)


उद्योग सुरू असणाऱ्यांनाच कर्ज
कोल्हापूर जिल्ह्यात २६ जानेवारी २०१८ अखेर सुमारे ८०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम बेरोजगार, नवा व्यवसाय सुरू करणाऱ्या युवक-युवतींना विना जामीन, विना तारण दिल्याची शक्यता नक्कीच नाही. ज्यांचे उद्योग सुरू आहेत, मोठी कर्जे घेतली आहेत, अशांना ‘मुद्रा’मधून पुन्हा मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली गेली असून, बचत गटांना आणि कृषी वित्तपुरवठ्याचीही प्रकरणे त्यात समाविष्ट केल्याने हा आकडा वाढल्याची शक्यता आहे.

२६ जानेवारी २०१८ अखेरची आकडेवारी
बँकेचा प्रकार खातेदार मंजूर कर्ज रुपये वितरित कर्ज रुपये
स्टेट बँक समूह ११५२ ६० कोटी ९५ लाख ६० कोटी ७१ लाख
सर्व राष्ट्रीयीकृत बँका १०४३८ ३२७ कोटी ९६ लाख ३०४ कोटी २४ लाख
खासगी वाणिज्य बँका १४०२३ ११६ कोटी ९४ लाख ११६ कोटी ६२ लाख
प्रादेशिक ग्रामीण बँका १६८ २ कोटी ३१ लाख २ कोटी २२ लाख
लघु वित्त पुरवठा संस्था १,०९,१७३ २७७ कोटी ७१ लाख २७४ कोटी ९४ लाख
लघु वित्त पुरवठा बँका १३२५९ ३८ कोटी ४८ लाख ३८ कोटी ४८ लाख
१,४८,२१३ ८२४ कोटी ३५ लाख ७९७ कोटी २१ लाख

Web Title:  Who crores 800 crores from 'Mudra'? The unemployed educated unemployed:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.