गारगोटीचा पहिला थेट सरपंच कोण ?: चौरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:32 AM2018-05-23T00:32:34+5:302018-05-23T00:32:34+5:30

Who is the first direct sarpanch of Peacotti? | गारगोटीचा पहिला थेट सरपंच कोण ?: चौरंगी लढत

गारगोटीचा पहिला थेट सरपंच कोण ?: चौरंगी लढत

Next
ठळक मुद्देप्रकाश अबिटकर यांना रोखण्यासाठी के. पी. पाटील, भाजपचे राहुल देसाई यांची आघाडी

शिवाजी सावंत ।
गारगोटी : जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून गारगोटी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. सध्या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. लोकनियुक्त थेट सरपंच होण्याची ही पहिलीच वेळ असून भविष्यात नगरपंचायत होण्याची शक्यता असल्याने थेट सरपंच होण्याची पहिली आणि शेवटची संधी आहे. त्यामुळे लोकनियुक्त थेट पहिला आणि अखेरचा सरपंच होण्याचा बहुमान कोणाला मिळणार याविषयी चुरस आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रकाश अबिटकर यांना रोखण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील, भाजप नेते राहुल देसाई यांनी आघाडी केली आहे. तर तरुणांनी एकत्र येऊन युवकक्रांती आघाडी तयार केली आहे. आमदार प्रकाश अबिटकर, राहुल देसाई यांनी स्वतंत्रपणे सरपंच व उमेदवार उभे केलेत. तर दोन सरपंच स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पहिल्यांदाच थेट सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे.

सरपंच पदासाठी आमदार प्रकाश अबिटकर यांच्या गटाकडून राजेंद्र घोडके हे हॉटेल व्यावसायिक निवडणूक लढवित आहे. तर माजी आमदार के. पी. पाटील व राहुल देसाई यांच्या आघाडीतून पंचायत समितीच्या सदस्या गायत्री
भोपळे यांचे पती संदेश भोपळे निवडणूक लढवित आहेत.

युवक क्रांती आघाडीतून गावभागातील राजेंद्र यादव हे निवडणूक लढवित आहेत.
त्यांना उद्योजक सयाजी देसाई यांनी पाठिंबा दिला आहे.स्वाभिमानी तर्फे अशोक बुरूड हे निवडणूक लढवित आहेत. त्यांना काँग्रेसचे आमदार पाटील यांच्या गटाने पाठिंबा दिला आहे. मतदानासाठी केवळ पाच दिवस उरल्याने प्रचाराचा जोर वाढला आहे. घरोघरी जाऊनप्रत्यक्ष भेटीगाठीवर जोर सुरू आहे.मूळ गारगोटी आणि सोनाळीत वातावरण तापले आहे; पण
उपनगरात थोडासा जोर कमी आहे. उपनगरातील मतदार अंदाज देत नसल्याने उमेदवार निवडून येईपर्यंत खात्री सांगता येत नसल्याने उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत.

गारगोटीत ११२८८ इतके मतदार आहेत. १७ सदस्य व सरपंच अशा १८ जागांसाठी ही निवडणूक होत
आहे. गारगोटी शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले
आहे. अबिटकर यांच्या जोतिर्लिंग शहर विकास आघाडीतून विद्यमान सरपंच सरिता चिले, उपसरपंच
अरुण श्ािंदे, माजी सरपंच रूपाली राऊत, माजी सरपंच छाया
विजय सारंग यांचे पती विजय सारंग, माजी सदस्य सर्जेराव मोरे,
माजी सदस्य महेश सुतार यांच्या पत्नी धनश्री महेश सुतार अशा आजी-माजी सरपंच सदस्य यांना उमेदवारी दिली आहे.


प्रतिष्ठेची लढाई
विकासकामांच्या जोरावर आमदार प्रकाश अबिटकर गट निवडणूक लढवित आहे. तर, माजी आमदार के. पी. पाटील व राहुल देसाई यांच्या केदारलिंग आघाडीतून माजी सदस्य विजयराव अबिटकर, माजी सदस्य प्रकाश वास्कर, माजी सदस्य व मौनी विद्यापीठ प्रतिनिधी अलंकेश कांदळकर, माजी सरपंच सर्जेराव देसाई यांचे पुत्र सचिन देसाई, तालुका संघाचे संचालक विजय कोटकर यांच्या पत्नी स्नेहल विजय कोटकर या निवडणूक लढवित आहेत.

Web Title: Who is the first direct sarpanch of Peacotti?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.