कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:47 PM2022-08-02T12:47:41+5:302022-08-02T13:06:19+5:30

कोल्हापूर : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची राज्यात झंझावाती शिवसंवाद, निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेला शिवसैनिकांचा उदंड ...

Who is Aditya Thackeray?, Aditya Thackeray reply to Tanaji Sawant | कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

Next

कोल्हापूर : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची राज्यात झंझावाती शिवसंवाद, निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेला शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचा दुसऱ्या टप्यादरम्यान काल, सोमवारी आदित्या ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यात पोहचले आहेत. काल कोल्हापुरात झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा बंडखोरांवर निशाना साधला. आज ते कोल्हापूरमधून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा त्यांनी बंडखोरांवर तोफ डागली. यावेळी त्यांना बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यांनी दुर्लक्ष करत सावंतांवर बोलणं टाळलं.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, हा माझा राजकीय दौरा नाही, लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जनता आम्ही उद्धव ठाकरे सोबत असल्याचे सांगत आहे. शिवसेनेला, ठाकरे कुटुंबियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र जनता आम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही. गद्दारांचे गेली एक महिना जे नाटक सुरु आहे, की आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे मात्र गद्दारांचे खरे चेहरे आता दिसू लागले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गद्दार हा गद्दारच असतो, हे सरकार बेकायदेशीर असून ते लवकर कोसळणार असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा केला. गद्दारीचा हा पॅटर्न इतर राज्यात जायला लागला तर देशात अस्थिरता निर्माण होवू शकते अशी चिंता देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर, या बंडखोरांचा जनताच निकाल लावेल. 33 दिवस होऊनही अजून सरकारला तिसरा माणूस सापडलेला नाही. दोघांचेचं जम्बो कॅबिनेट आहे. अन् नेमकं खरा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न पडल्याची खोचक टीका देखील केली.  

आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले तानाजी सावंत

आदित्य ठाकरे कोल्हापुरानंतर आज पुण्यातील कात्रज चौकात तानाजी सावंत यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यावरून तानाजी सावंत यांनी टीका करत, हे शक्तिप्रदर्शन नव्हे तर शक्तीपात झाला आहे. शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे आली आहे. शिवसेना म्हणून एकही शिवसैनिक राहिला नाही. आदित्य ठाकरेंची शेवटची धडपड सुरू आहे. कोण आदित्य ठाकरे? काय संबंध? आदित्य ठाकरे हा एक आमदार आहे यापेक्षा फारसं महत्त्व देत नाही. आदित्य ठाकरे असो किंवा अन्य कुणी ज्यांनी सभा आयोजित केली असेल त्यावर मी लक्ष देत नाही असा टोला तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंना लगावला होता.

Web Title: Who is Aditya Thackeray?, Aditya Thackeray reply to Tanaji Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.