कोल्हापूर जिल्ह्यात १९७२ ते २०१९ पर्यंत सर्वात कमी, सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले आमदार कोण.. वाचा सविस्तर

By राजाराम लोंढे | Published: October 24, 2024 05:31 PM2024-10-24T17:31:22+5:302024-10-24T17:32:08+5:30

काेल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या बहुतांशी विधानसभा निवडणुका अटीतटीच्या

Who is the MLA who got least, most votes in Kolhapur district from 1972 to 2019 Read in detail | कोल्हापूर जिल्ह्यात १९७२ ते २०१९ पर्यंत सर्वात कमी, सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले आमदार कोण.. वाचा सविस्तर

कोल्हापूर जिल्ह्यात १९७२ ते २०१९ पर्यंत सर्वात कमी, सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले आमदार कोण.. वाचा सविस्तर

राजाराम लोंढे

कोल्हापूर : लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुका नेहमीच अटीतटीच्या हाेतात. काटाजोडी लढतीत अगदी कमी मताधिक्याने अनेकांना गुलाल लागला आहे. काहीजण भरघोस तर काहींना अगदी थोडक्या मताधिक्यांनी चुटपुट लावणारे जय-पराजय कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवले आहेत. त्यामध्ये सर्वात कमी केवळ ११ मतांनी दिवंगत आमदार नरसिंगराव पाटील हे विजयी झाले तर सर्वाधिक ७३ हजार १७४ इतक्या मताधिक्यांनी आमदार प्रकाश आवाडे हे विजयी झाले.

काेल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या बहुतांशी विधानसभा निवडणुका अटीतटीच्या व इर्षेने झालेल्या आहेत. पूर्वरचनेपूर्वी मतदार संख्या कमी असल्याने सर्वच ठिकाणी काटाजोड लढती व्हायच्या. कमी मताच्या निवडणुका असल्याने अनेक वेळा अपक्षही मुसंडी मारत होते. मात्र, २००९ नंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने एक गठ्ठा मतावरच निकाल फिरू लागले. मतदारसंघाची व्याप्ती वाढल्याने उमेदवारांची दमछाकही होत आहे. कमी कालावधीत नवख्या उमेदवारीला मतदारापर्यंत पोहचता येत नाही.

आधी ‘भरमूण्णां’ना गुलाल नंतर ‘नरसिंगरावां’चा जल्लोष

कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात कमी म्हणजेच ११ मतांनी जनसुराज्य पक्षाचे नरसिंगराव पाटील यांनी विजयी मिळवला. ‘चंदगड’ मतदारसंघात त्यावेळी जनसुराज्यकडून नरसिंगराव पाटील, शिवसेनेकडून भरमूण्णा पाटील तर राष्ट्रवादीकडून गोपाळराव पाटील रिंगणात हाेते. तिघांना जवळपास तेवढीच मते मिळाल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहचली होती. भरमूण्णा पाटील हे १३ मतांची विजयी झाल्याचे समजताच त्यांनी गुलालाची उधळण केली. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही, संपूर्ण मतमोजणीनंतर नरसिंगराव पाटील हे ११ मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले.

१९७२ ते २०१९ पर्यंत सर्वाधिक मताधिक्याने विजयी 

निवडणूक उमेदवार  पक्ष   मताधिक्य
१९७२   रत्नाप्पाण्णा कुंभार    काँग्रेस ४२,९१८
१९७८उदयसिंगराव गायकवाड काँग्रेस     ३९,३४५
१९८० बाबासाहेब पाटील-सरुडकर काँग्रेस    ३३,२९१
१९८५ जयवंतराव आवळे काँग्रेस    २१,६४३
१९९०श्रीपतराव बोंद्रे काँग्रेस    ३५,१४७
१९९५ दिग्विजय खानविलकर काँग्रेस    ३१,५३२
१९९९प्रकाश आवाडे काँग्रेस    २२,९६३
२००४  प्रकाश आवाडे काँग्रेस    ७३,१७४
२००९हसन मुश्रीफ  राष्ट्रवादी काँग्रेस ४६,४१२
२०१४ प्रकाश आबीटकर शिवसेना ३९,४०८
२०१९ ऋतुराज पाटील काँग्रेस४२,७०३

सर्वात कमी मताधिक्य 

२००४नरसिंगराव पाटील जनसुराज्य पक्ष ११
१९८५सदाशिवराव मंडलिक काँग्रेस २३१
२००४ सत्यजीत पाटील शिवसेना ३८८
१९९० श्रीपतराव शिंदे जनता दल ६७४
२०१४ चंद्रदीप नरके शिवसेना  ७१०

Web Title: Who is the MLA who got least, most votes in Kolhapur district from 1972 to 2019 Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.