कणकवलीचा नवा नगराध्यक्षा कोण ?

By Admin | Published: October 8, 2015 12:23 AM2015-10-08T00:23:48+5:302015-10-08T00:23:48+5:30

आज निवडणूक : भाजपने पारकर गटाला पाठिंबा दिल्याने उत्सुकता शिगेला

Who is the new city of Kankavli? | कणकवलीचा नवा नगराध्यक्षा कोण ?

कणकवलीचा नवा नगराध्यक्षा कोण ?

googlenewsNext

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी गुरूवारी निवडणूक होत आहे. काँग्रेस अंतर्गत दोन गटांमध्येच नगराध्यक्षपदासाठी चढाओढ आहे. यातील पारकर गटाला भाजपचा पाठिंबा असल्याचे बुधवारी सायंकाळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. कणकवली नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुविधा साटम कि पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यापैकी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.कणकवली नगरपंचायतीमध्ये एकुण १७ जागा असून त्यात काँग्रेसचे १३ सदस्य (पारकर समर्थक मिळून), शिवसेनेचे ३ आणि भाजपचा एक असे पक्षीय बलाबल आहे. यात पारकर गटाच्या चार सदस्यांनी माधुरी गायकवाड यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसतर्फे सुविधा साटम यांनी अर्ज भरला आहे. पारकर गटाचे ४ आणि विरोधी गटाचे (सेना-भाजप मिळून ) ४ असे ८ सदस्य होत आहेत. तर काँग्रेसच्या उर्वरीत ९ सदस्यांपैकी एखाद्या सदस्याने जरी पारकर गटाला मतदान केले तर माधुरी गायकवाड नगराध्यक्ष होवू शकतात.
यापूर्वी भाजपाच्या राजश्री धुमाळे यांनी आपण या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची भूमिका घेतली होती. मात्र, बुधवारी जठार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केल्याने नगराध्यक्ष निवडणुकीतील चुरस वाढली आहे. (प्रतिनिधी)

काँग्रेस मात्र निवांत
काँग्रेसच्या १३ पैकी पारकर समर्थक ४ नगरसेवक वगळता ९ जण उमेदवारी अर्ज दाखल करताना एकत्र होते. त्यामुळे त्या ९ जणांनी ठामपणे सुविधा साटम यांना मतदान केल्यास काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष होवू शकतात. गेले दोन दिवस काँग्रेसचे सर्व नगरसेवक निवांत असून आता प्रत्यक्षात गुरूवारी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.


पारकर काँग्रेसमुक्त अभियानात सहभागी होतील
आमच्या कॉँग्रेसमुक्त अभियानात संदेश पारकर सहभागी होतील, असे ठामपणे वाटते. तसे झाले नाही तर पारकर यांची राजकारणातील ही शेवटची उचकी ठरेल. पारकर भाजपमध्ये येणार की नाही हे त्यांच्या राजकीय परिपक्वतेवर सोडून देतो, असे प्रमोद जठार यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

Web Title: Who is the new city of Kankavli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.