वाहतूक कोंडी फोडणार कोण ?

By Admin | Published: June 20, 2016 12:58 AM2016-06-20T00:58:47+5:302016-06-20T00:58:47+5:30

उचगाव ब्रीजची समस्या : वाहतूक नियंत्रणासाठी संबंधित विभागांनी लक्ष देण्याची गरज

Who will break the traffic jam? | वाहतूक कोंडी फोडणार कोण ?

वाहतूक कोंडी फोडणार कोण ?

googlenewsNext

 मोहन सातपुते ल्ल उचगाव
उचगाव (ता. करवीर) येथे वाहन पार्किंगचा पेच कायम असून, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. कोल्हापूर शहरात, एमआयडीसीकडे ये-जा करण्याकरिता बहुतेक वाहनधारक याच ब्रीजचा वापर करतात. शहराकडून येणारी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत वर्दळ वाढली आहे. असे असताना येथील वाहतूक कोंडीकडे कोणत्याच विभागाचे लक्ष नाही. ही वाहतूक कोंडी फोडणार कोण, हा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत.
उचगाव-हुपरी या मार्गावर चांदी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वाहनधारक व उद्योजक या मार्गाचा वापर करीत आहेत. बंदी असतानाही अवजड वाहने नो एन्ट्रीच्या मार्गावरच थांबलेली असतात. सार्वजनिक जागांवरही अतिक्रमणाचा घट्ट विळखा पडला आहे. दाटीवाटीनं पानटपऱ्या, खोकी, हातगाडी, फेरीवाले याच रोडवर हातावरची पोटं भरण्यासाठी गर्दी करून राहिले आहेत. मटन, चिकन, मासे विक्रीचा व्यवसायही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत असतो. या निमित्ताने येणारी-जाणारी वाहने, सायकल, मोटारसायकल, आॅटो रिक्षा, कार, डिलिव्हरी व्हॅँन, ट्रक व बस, ट्रॅक्टर, स्कूल बस यासारखी वाहने रस्त्यावरच थांबल्याने मोठ्या ट्राफिकच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे.
मुख्य रस्त्यावरच चार बीअर शॉपी, बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट, देशी दारू दुकानामुळे तळिरामांची गर्दी वाढत आहे. यांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. काही खासगी इमारती व दुकानदारांकडे स्वमालकीचे पार्किंग नसल्याने भरीस भर म्हणून त्यांचीही वाहने रस्त्यावर थांबल्या कारणामुळे वाहतुकीची बारमाही कोंडी होत आहे. वाहनांच्या गर्दीतून सामान्य लोकांना रस्ता शोध अवघड झाले आहे.
धोका : रस्त्यावर पार्किंग
४उचगाव ब्रीज ते उचगाव नाका या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागते.
४उचगाव कमानीशेजारील चौकात अस्ताव्यस्त पार्किंगने डोकेदुखी वाढवली आहे. चौकातूनच गावातील मुख्य रस्त्याकडे वळावे लागत आहे. परिणामी अपघातांचा धोका वाढलेला आहे.

Web Title: Who will break the traffic jam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.