ट्रेझरीच्या ‘चाव्यां’साठी रस्सीखेच किंवा ट्रेझरीच्या ‘चाव्या’ कोणाला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:03+5:302020-12-28T04:13:03+5:30

प्रभागाचा कानोसा : प्रभाग क्रमांक २७ ट्रेझरी ऑफिस : विद्यमान नगरसेवक महेजबीन सुभेदार विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर ...

Who will get the ropes for the 'keys' of the treasury or the 'keys' of the treasury? | ट्रेझरीच्या ‘चाव्यां’साठी रस्सीखेच किंवा ट्रेझरीच्या ‘चाव्या’ कोणाला मिळणार

ट्रेझरीच्या ‘चाव्यां’साठी रस्सीखेच किंवा ट्रेझरीच्या ‘चाव्या’ कोणाला मिळणार

Next

प्रभागाचा कानोसा : प्रभाग क्रमांक २७ ट्रेझरी ऑफिस : विद्यमान नगरसेवक महेजबीन सुभेदार

विनोद सावंत/

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहराच्या मध्यवस्तीत असणारा प्रभाग क्रमांक २७ ट्रेझरी ऑफिस हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. गतवेळच्या निवडणुकीत ताराराणी आघाडीने येथे बाजी मारली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभागावर पुन्हा कब्जा मिळविण्यासाठी चंग बांधला आहे. याचबरोबर काँग्रेस, शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार, यानंतर खऱ्याअर्थाने येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ट्रेझरी ऑफिस प्रभाग हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार यांच्या परिवाराने पाचवेळा येथून प्रतिनिधित्व केले आहे. गतवेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रभाग राखीव होता. राष्ट्रवादी विरुद्ध ताराराणी आघाडी अशीच थेट लढत झाली. ताराराणी आघाडीच्या मेहजबीन सुभेदार यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्यास खिंडार पाडत आर. के. पोवार यांच्या स्नुषा संगीता पोवार यांचा पराभव केला. तसेच शिवसेना, काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

यंदा सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. आर. के. पोवार यांचे पुतणे रमेश पोवार राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. गतवेळच्या पराभवाने खचून न जाता त्यांनी दुसऱ्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली. मागील निवडणुकीतील वचपा काढण्यासाठी प्रचाराला सुरुवातही केली आहे. विद्यमान नगरसेविका महजबीन सुभेदार यांनी महापालिकेच्या सत्तेत नसतानाही गेल्या पाच वर्षांत प्रभागात चांगली विकासकामे केली आहेत. त्यांचे पती रियाज सुभेदार यावेळी निवडणूक रिंगणात असणार आहेत. यासह युवराज पोवार, उदय पोवार, अतुल चव्हाण, शकील नगारजे, कादर मलबारी, मुस्ताक मकानदार, दत्ता कोंडेकर, इरशाद बंडवल यांच्या नावांची चर्चा प्रभागात सुरु आहे.

चौकट

पाच वर्षात झालेली विकासकामे...

लक्ष्मीपुरीतील परमाळे सायकल दुकान ते श्रीकांत मसाले रस्ता

रिलायन्स मॉल ते धान्य लाईन येथील रस्ता,

मेढे तालीम परिसरात सांस्कृतिक हॉल

अकबर मोहल्ला मस्जिद परिसरात सांस्कृतिक हॉल

व्हिनस कॉर्नर ते महाराणा प्रताप चौक रस्ता

व्हीनस कॉर्नर ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे रस्ता

फोर्ड कॉर्नर येथील बंद पेट्रोल पंप परिसरातील ३० वर्षांची सांडपाण्याची समस्या सोडवली.

संभाजी पूल ते विल्सन पूल कंपाऊंड वॉल

पूरबाधित १२० कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळवून दिली

लॉकडाऊनमध्ये ४५० जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली, आंबेडकर बोळ येथील २५ वर्षांपासूनची पाण्याची समस्या सोडवली.

घिसाड गल्लीतील पे अँड युज स्वच्छतागृह मोफत केले.

चौकट

पाच वर्षे रखडलेली कामे

गाडीअड्डा प्रकल्प पाच वर्षांपासून प्रलंबित, स्क्रॅप व्यावसायिकांचे पुन्हा अतिक्रमण

कोंबडी बाजार प्रकल्पाला ठेकेदार मिळत नसल्यामुळे उत्पन्न थांबले

झाकीर हुसेन उर्दू मराठी शाळा येथील प्रकल्प रखडला.

अनेक ठिकाणी रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईन नसल्याचा फटका

पिण्याच्या पाईपलाईनची कामे अपुरी

उर्दू शाळा येथे कचरा उठाव वेळेवर होत नाही.

चौकट

गतवेळच्या निवडणुकीतील उमेदवार, मिळालेली मते

महेजबीन सुभेदार ताराराणी आघाडी, २१६५

संगीता पोवार, राष्ट्रवादी १६८४

दीपाली पोवार, शिवसेना, ३५५

मीनाज जमादार, काँग्रेस, २७७

प्रतिक्रिया : प्रभागातील समस्या प्रभावीपणे सभागृहात मांडल्या. विरोधात असतानाही कोट्यवधींचा निधी आणला. गाडीअड्डा, कोंबडी बाजार, झाकीर हुसेन उर्दू शाळा येथील प्रकल्पासाठी प्रयत्न केले. मात्र, ठेकेदार मिळू शकले नाहीत. नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळाचे काम आपल्या कारकीर्दीत झाल्याचे समाधान आहे. पुन्हा संधी मिळाल्यास प्रभागातील बेरोजगारांना रोजगार देणे, महिला बचत गटांमार्फत उत्पन्नाची साधने निर्माण करणार आहे.

- मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेविका

फोटो : २७१२२०२० कोल गाडीअड्डा प्रभाग कानोसा न्यूज

ओळी : कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर येथील गाडीअड्डामध्ये पे अँड पार्किंगचा प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासू्न रखडला असून पुन्हा स्क्रॅप व्यावसायिकांनी येथे कामे सुरु केली आहेत.

Web Title: Who will get the ropes for the 'keys' of the treasury or the 'keys' of the treasury?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.