कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ ... संजय मंडलिक यांच्या जन्मगाव मुरगूड मध्ये जल्लोषा ला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 14:34 IST2019-05-23T10:58:03+5:302019-05-23T14:34:51+5:30

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात निकालाचा ट्रेंड बदलण्याची शक्यता दिसत नाही. कारण एकाही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक याना मताधिक्य मिळताना दिसत नाही..कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक हे सहाव्या(पूर्ण) फेरीअखेर ९६१८२ मतांनी आघाडीवर..मंडलिक यांचे जन्मगाव मुरगूड मध्ये जल्लोषा ला सुरवात

Who wins Kolhapur; ... Mandlik's birthplace begins in the shade of mungood | कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ ... संजय मंडलिक यांच्या जन्मगाव मुरगूड मध्ये जल्लोषा ला सुरवात

कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ ... संजय मंडलिक यांच्या जन्मगाव मुरगूड मध्ये जल्लोषा ला सुरवात

ठळक मुद्देकोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक हे मतांनी आघाडीवरमुरगूड मध्ये पोलीस व समर्थकात बाचाबाचीअजिंक्यतारावर फटाके व अॅटमबॉम्ब वाजवायला सुरवात

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक यांची निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल. आतापर्यंत मोजणी झालेल्या पण जाहीर न झालेल्या मतांमध्ये मंडलिक यांना सहाव्या फेरीअखेर 81924 मताधिक्य मिळाले आहे. अजून १२ फेऱ्या मोजायच्या आहेत. पण निकालाचा ट्रेंड बदलण्याची शक्यता दिसत नाही. कारण एकाही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक याना मताधिक्य मिळताना दिसत नाही..

 २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेत कोल्हापूर मतदार संघात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनीच बाजी मारली होती. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदावर संजय मंडलिक हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे पिछाडीवर राहिले आहे.

Web Title: Who wins Kolhapur; ... Mandlik's birthplace begins in the shade of mungood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.