चंद्रकांत पाटीलको गुस्सा क्यों आता है
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:31+5:302021-05-16T04:23:31+5:30
: देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणातील वस्तुस्थितीची माहिती इचलकरंजी : मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र ...
: देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणातील वस्तुस्थितीची माहिती
इचलकरंजी : मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातील सर्व गोष्टी माहिती असताना, आरक्षणाबाबत वस्तुस्थिती मांडल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना गुस्सा क्यों आता है, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
इचलकरंजी येथील कोरोनाबाबत मंत्री मुश्रीफ यांनी आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, पश्चिम बंगालच्या निकालावर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केल्यानंतर पंढरपूर विधानसभा निवडणुकीवर बोला, तुम्ही निर्दोष झालेला नाही. जामिनावर सुटल्याची धमकी पाटील देतात. आता मराठा आरक्षणावर मंत्री अशाेक चव्हाण यांनी वक्तव्य केल्यानंतर लगेच त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह टीका केली. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, त्यातील मुद्द्यांवर मंत्री चव्हाण बोलत होते. मराठा आरक्षणातील सर्व खाचाखुचा देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहेत. मग त्याबद्दल बोलले तर पाटील यांना राग का येतो, असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला.
कोरोना काळात राजकारण चुकीचे
आम्ही तिन्ही मंत्री जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत. हा कठीण काळ आहे, अशा काळात राजकारण करणे चुकीचे आहे. तरीही प्रकाश आवाडे यांना गुस्सा क्यों आता है, असा टोलाही मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.