२२७ कोटी रुपये देऊनही आंबे ओहोळ प्रकल्पाचे पुनर्वसन का रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:14+5:302021-08-29T04:25:14+5:30
आम्ही सत्तेत असताना अर्धवट असलेला आंबेओहोळ प्रकल्प निधीअभावी रखडला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २२७ कोटी निधीची तरतूद केली. ...
आम्ही सत्तेत असताना अर्धवट असलेला आंबेओहोळ प्रकल्प निधीअभावी रखडला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २२७ कोटी निधीची तरतूद केली. यामध्ये पुनर्वसनाचा हा समावेश मग प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन का रखडले ? सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील यांनी उत्तूर (ता. आजरा) येथे आयोजित आंबेओहोळ प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा प्रवक्ते धनजंय महाडिक होते.
पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी रखडलेले प्रकल्प, रस्ते, पूर्ण करण्याचे नियोजन होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची धारणा होती का अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्याची होती. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी व भरीव निधीच्या तरतुदीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी पाठपुरावा केला. आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण होऊन पाणीसाठा व पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आले. पुनर्वसनासह निधी दिला असताना धरणग्रस्तांचे अजून ही पुनर्वसन रखडले आहे.
कार्यक्रमास सुरेश हळवणकर, हिंदूराव शेळके, सुधीर कुंभार, नाथा जी. पाटील ,अशोक चराटी, राहुल देसाई ,आशिष देसाई, प्रवीण लोकरे, भास्कर भाईगडे, धोंडीराम सावंत, संजय धुरे, बाळू सावंत, धनाजी गुरबे, संतोष बेलवाडे, श्रीपती यादव, दीपक आमणगी धरणग्रस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
मुश्रीफांनी एका व्यासपीठावर यावे
आंबेओहोळ प्रकल्पासाठी निधीची तरतूद कोणी केली, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन का रखडले आदीसह प्रकल्पांच्या प्रश्नाबाबत मंत्री मुश्रीफ यांनी एका व्यासपीठावर यावे, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.
फोटो ओळी : आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाला भाजप सत्तेत असताना २२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रकल्प पूर्ण झाल्याने उत्तूर - कडगाव येथील शेतकऱ्यांनी हार घालून सत्कार केला. यावेळी समरजित घाटगे, सुरेश हाळवणकर, धनजंय महाडिक, हिंदूराव शेळके (सतीश डिजिटल )
क्रमांक : २८०८२०२१-गड-०३