पतीपाठोपाठ चार तासांत पत्नीचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:56+5:302021-05-14T04:23:56+5:30
कोगनोळी : कोगनोळी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सेवा संघाचे माजी सेक्रेटरी पांडुरंग कल्लाप्पा मोरडे (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने ...
कोगनोळी : कोगनोळी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सेवा संघाचे माजी सेक्रेटरी पांडुरंग कल्लाप्पा मोरडे (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पतीच्या या निधनाने धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नी आनंदी पांडुरंग मोरडे (वय ५०) यांचेही चार तासांमध्ये निधन झाल्याने कोगनोळी हणबरवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पांडुरंग मोरडे हे मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. या आजारामुळे त्यांच्या पायाला झालेली जखम लवकर बरी होत नव्हती. त्यातून त्यांच्याही प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी निर्माण होऊ लागल्या. त्यामध्ये पहाटे ५ वाजेच्या सुमारास पांडुरंग मोरडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चार तासांत पत्नीचेही निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.
१३ पांडुरंग मोरडे
१३ आनंदी मोरडे