पत्नी पाठोपाठ पतीचेही एकाच दिवशी निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:50 PM2021-05-05T17:50:53+5:302021-05-05T17:57:10+5:30
KolhapurNews : शाहूपुरी पाचव्या गल्लीतील राजश्री राजन कोरडे (वय ५५) व त्यांचे पती राजन वामनराव कोरडे (वय ६१)यांचे मंगळवारी (दि. ४) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दोघांचाही एकाच दिवशी आठ तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने त्याची चर्चा सोशल मिडीयावरून सर्वत्र होत असून हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : शाहूपुरी पाचव्या गल्लीतील राजश्री राजन कोरडे (वय ५५) व त्यांचे पती राजन वामनराव कोरडे (वय ६१)यांचे मंगळवारी (दि. ४) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दोघांचाही एकाच दिवशी आठ तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने त्याची चर्चा सोशल मिडीयावरून सर्वत्र होत असून हळहळ व्यक्त होत आहे.
महाद्वार रोडवर दीपक फरसाण ॲन्ड स्वीटस मार्ट हे दुकान गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ कोल्हापूरकर खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. या प्रसिद्ध दुकानाची स्थापना वामनराव कोरडे यांनी पन्नास वर्षांपुर्वी केली. कालांतराने त्यांचे सुपुत्र राजन हे दुकान पाहू लागले. दुकानामुळे राजन हे सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे.
मंगळवारी पत्नी राजश्री यांचे सकाळी ८.३० वाजता उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. तर त्याच दिवशी आठ तासांच्या अंतराने सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राजन यांचेही उपचारादरम्यान निधन झाले. एकाच दिवशी आई-वडीलांचे निधन झाल्यामुळे कोरडे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या निधनाची बातमी सोशल मिडीयावरून सर्वत्र व्हायरल होत असल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.