वायफाय सिटी प्रकल्प ‘बीओटी’वर राबविणार

By admin | Published: March 12, 2016 01:04 AM2016-03-12T01:04:55+5:302016-03-12T01:06:18+5:30

महापालिकेचे ११५८ कोटींचे अंदाजपत्रक ‘स्थायी’ला सादर

Wifi city project 'Bot' will be implemented | वायफाय सिटी प्रकल्प ‘बीओटी’वर राबविणार

वायफाय सिटी प्रकल्प ‘बीओटी’वर राबविणार

Next

कोल्हापूर : मर्यादित आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन नवीन योजनांच्या फंदात न पडता सध्या अपूर्ण असलेल्या सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देणारे सन २०१६-२०१७ चे अंदाजपत्रक महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीसमोर मांडले. पुढील आर्थिक वर्षात कोल्हापूर शहर वायफाय सिटी प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर कार्यान्वित करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे; तर रंकाळा, क ळंबा तलाव, सार्वजनिक उद्याने, पर्यावरण संवर्धनास अंदाजपत्रकात प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१६-२०१७ सालाचे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प मिळून ११५८ कोटी ४६ लाख १९ हजार ५५६ रुपयांचे नवीन अंदाजपत्रक आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्थायी समितीसमोर मांडले. उत्पन्नाचे मर्यादित स्रोत, आस्थापनांवरील वाढता खर्च यांचा ताळमेळ घालताना मेटाकुटीस आलेल्या प्रशासनाने नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात उत्पन्न वाढविण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे एलबीटी, नगररचना, घरफाळा, आदी विभागांकडून पुढील वर्षात किमान ५८ ते ६० कोटींचे जादा उत्पन्न मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. शिवाय खर्चात काटकसर करण्याचाही निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण शहरातील पथदिव्यांसाठी एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. यामुळे आठ कोटींचे वीज बिल चार कोटींपर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे.
शहरात सुरू असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सेफ सिटी योजना, तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देऊन नवीन वर्षात ते पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामास भांडवली खर्चाच्या २५ टक्के म्हणजे तब्बल ११९ कोटी रुपयांची तरतूद अंदापत्रकात करण्यात आलेली आहे. शिवाय ४०० कोटींच्या भुयारी गटार योजना व जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे प्रस्ताव राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले असून ते मंजूर करून आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. (प्रतिनिधी)


रंकाळा, क ळंबा तलाव, सार्वजनिक उद्याने, पर्यावरण संवर्धनास प्राधान्य
शहरातील पथदिव्यांसाठी एलईडी बल्ब बसविणार

Web Title: Wifi city project 'Bot' will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.