गावठी बॉम्ब वन्यप्राण्यांच्या जीवावर!

By admin | Published: February 15, 2015 08:47 PM2015-02-15T20:47:59+5:302015-02-15T23:41:17+5:30

दोन कुत्र्यांचा बळी : काळोशीच्या जंगलात डुकरांच्या शिकारीसाठी पेरलेला बॉम्ब महिलेच्या हाती

Wild bombs kill wild animals! | गावठी बॉम्ब वन्यप्राण्यांच्या जीवावर!

गावठी बॉम्ब वन्यप्राण्यांच्या जीवावर!

Next

परळी : डुकरांची शिकार करण्यासाठी जिलेटिनपासून बनविलेले गावठी बॉम्ब पेरले जात आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा नाहक बळी जात आहे. काळोशी, ता. सातारा येथे रविवारी दोन कुत्र्यांच्या या बॉम्बच्या स्फोटात बळी गेला आहे. दरम्यान, एका महिलेला एक बॉम्ब सापडला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी धावले.पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काळोशी व परळी भागारत गेल्या चार महिन्यांपासून राजस्तान, उत्तरप्रदेश येथील शिकारी या परिसरात मुक्कामास आहेत. रोजरोज वेगवेगळ्या ठिकाणी जातात. जिलेटिनच्या कांड्यांचा वापर करून बॉम्ब गोळे तयार करतात. असाच प्रकार त्यांनी शुक्रवार, दि. १३ काळोशीच्या शेजारील किसन नारायण डफळ यांच्या शेताजवळ बॉम्बगोळा पेरला होता. त्यादिवशी संध्याकाळी कारवानी जातीच्या कुत्र्यांनी बॉम्बचा चावा घेतला आणि झालेल्या स्फोटोत त्यांचा बळी गेला. या गावठी गोळ्यांना कणिक लावली जाते. यामुळे कणिक खाण्यासाठी वन्यप्राण्यांनी गोळा कुडतरला असता स्फोट होतो, अन् प्राण्याची शिकार होते.शीलाबाई मनोहर देशमुख या रानात शेळ्या चारावयास गेल्या असता. रस्त्यातच असा प्रकारचा बॉम्बगोळा आढळला. त्यांनी लगेचच तो शेजारील झाडांवर बांधून ठेवला. याची मािहती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात व वनविभागाला सूचना देण्यात आली. त्यानुसार रविवार, दि. १५ रोजी सकाळी सातारा पोलीस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काशोळी, करुण, लावंघर, करंजे आदी परिसरात शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांनी शीलाबाई देशमुख यांना सापडलेला बॉम्ब सोडवून घेतला. डुकरांची शिकार करण्यासाठी जिलेटिनच्या बॉम्बचा वापर केला जातो. हे जिलेटिन कोठून येतात, याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

चार महिने काही शिकारी काळोशीच्या डोंगरात आहेत. ग्रामस्थांनी याबाबत वनविभागास सूचना दिल्या आहेत. परंतु, ज्यावेळी वनविभागाचे लोक येतात. तेव्हा ते त्याठिकाणी नसतात. त्यामुळे दोघांचे साटेलोट आहे, हे लोक चंदनाच्या झाडांचेही चोरी करतात.
- बबन डफळ,
ग्रामस्थ काळोशी


आम्ही अनेकदा ग्रामस्थांना घेऊन शिकारी शोधण्यासाठी गेलो आहे. अनेकवेळा राजस्तानचे लोक हाकलून दिले आहेत. तर अनेक वेळा याच शिकारींनी आमच्यावरच हल्ला केला आहे. ही उत्तरप्रदेश व राजस्तान येथून याठिकाणी येतात.
- चंद्रकांत धोत्रे,
वनपाल, परळी

शिकारी-वनखाते साथ-साथचा आरोप
या परिसरात वारंवार शिकारी उत्तर प्रदेश, राजस्तान येथून येतात. डुकरांचे प्रमाण कोणत्या ठिकाणी किंवा प्राणी कोणत्या ठिकाणी आहेत. यांची सर्व माहिती वनविभागाचे कर्मचारीच देतात, असा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे. अन्यथा शिकारी वनहद्दीत आलेच नसते, अशी टीका केली जात आहे.


प्रशासनाने मुळाशी जाण्याची गरज

जिलेटिनच्या कांडीचा वापर असे बॉम्ब तयार करण्यासाठी केला जातो. या जिलेटिनच्या कांड्या शक्यतो मिळत नाहीत. यांच्या बेकायदारीत्या विक्री केली जाते. ती कोण करते, कुठून येतात व हे बॉम्ब कशा प्रकारे तयार केले जातात. यांच्या मुळाशी प्रशासनाने जाण्याची गरज आहे. कारण, असे बॉम्ब जास्त प्रमाणात गावानजीकच आढळतात. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच मुळाशी जाण्याची गरज आहे. अन्यथा माण तालुक्यातील बोथे घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Wild bombs kill wild animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.