Kolhapur: सादळे-मादळेत पडक्या विहिरीत पडला रानटी डुकरांचा कळप; वनविभाग, रेस्कू टीमने दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:15 PM2024-01-25T12:15:08+5:302024-01-25T12:15:27+5:30

शिरोली : सादळे मादळे (ता. करवीर) येथे पडक्या विहिरीत पडलेल्या दहा रानटी डुकरांच्या कळपाला वनविभाग व रेस्कू टीमने ५ ...

Wild pigs fell into the well in sadale madale kolhapur | Kolhapur: सादळे-मादळेत पडक्या विहिरीत पडला रानटी डुकरांचा कळप; वनविभाग, रेस्कू टीमने दिले जीवदान

Kolhapur: सादळे-मादळेत पडक्या विहिरीत पडला रानटी डुकरांचा कळप; वनविभाग, रेस्कू टीमने दिले जीवदान

शिरोली : सादळे मादळे (ता. करवीर) येथे पडक्या विहिरीत पडलेल्या दहा रानटी डुकरांच्या कळपाला वनविभाग व रेस्कू टीमने ५ तासांच्या अथक परिश्रमाने बाहेर काढून जीवदान दिले दिले.

अधिक माहिती अशी सादळे, ता. करवीर येथे सिद्धेश्वर मंदिराच्या पश्चिमेस विक्रम पाटील यांच्या शेतामध्ये अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी एक ते दीड वर्ष वयाचा दहा रानटी डुकरांचा कळप वावरत असताना पन्नास फूट खोल पडक्या विहिरीत पडला, बुधवारी सकाळी सादळे येथील शेतकरी तानाजी पाटील शेतात जात असताना त्यांना डुकरांचा कळप विहिरीत पडलेला आढळून आला. त्यांनी सादळे मादळे ग्रामपंचायतीला याची कल्पना दिली. ग्रामपंचायतीने वनविभागाला कळल्यानंतर ताबडतोब वनविभागाचे कर्मचारी व रेस्कू टीम लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाली. 

वनविभागाने विहिरी भोवतालचे झुडपे काढून दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून जाळीचा वापर करून एक एक करून दहा डुकरांना विहिरीतून बाहेर काढून पिंजऱ्यामध्ये बंद केले याकरिता जवळपास पाच तासांचा कालावधी लागला. यानंतर वनविभागाच्या व्हॅनमध्ये पिंजरे घालून डुकरांना नैसर्गिक अधिवास सोडण्यासाठी नेण्यात आले यावेळी वनविभागाचे विकास घोलप सुरेश दळवी. वन्यजीव बचाव पथक वनविभाग कोल्हापूर, वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी, छत्रपती वाइल्ड लाइफ कोल्हापूर, ॲडव्हेंचर गीअर कोल्हापूरसह रेस्कू टीममध्ये एकूण २० सदस्य सहभागी झाले होते.

Web Title: Wild pigs fell into the well in sadale madale kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.