खडकेवाड्यात मेंढ्यांवर वन्यप्राण्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:44 AM2021-02-28T04:44:29+5:302021-02-28T04:44:29+5:30
: खडकेवाडा (ता. कागल) येथील आनंदा वासुदेव मेटकर या मेंढपाळाच्या २२ बकऱ्यांवर अज्ञात प्राण्याने हल्ला केला. यामध्ये १४ बकरी ...
: खडकेवाडा (ता. कागल) येथील आनंदा वासुदेव मेटकर या मेंढपाळाच्या २२ बकऱ्यांवर अज्ञात प्राण्याने हल्ला केला. यामध्ये १४ बकरी मृत्युमुखी पडली, तर ८ बकरी गंभीर जखमी झाली आहेत. त्यामुळे मेटकर कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले. हल्ल्याचे स्वरूप पाहता बिबट्या किंवा तरस असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. मेटकर यांच्या मेंढ्यावर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे.
गावच्या उत्तरेला माळरानावर मेटकर यांचा मेंढ्यांचा कळप आहे. मेटकर हे पाणी आणण्यासाठी गेले असता अज्ञात प्राण्याने लोखंडी जाळीवरून उडी मारून या कळपावर हल्ला केला. तलाठी उमा कारंडे, पोलीस पाटील आप्पासाहेब पोवार, कोतवाल सुरेखा खोत यांनी घटनेचा पंचनामा केला, तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मगदूम यांनी जखमी मेंढ्यावर उपचार केले. या कुटुंबाला शासनपातळीवरून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.