ंशाहूनगरीत सलोखा कायमच ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:00 AM2018-01-15T01:00:40+5:302018-01-15T01:01:15+5:30
कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या पुरोगामी नगरीत सामाजिक सलोख्याची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला आहे; परंतु यामुळे येथील सलोख्यावर कोणताही परिणाम झाला नसून, तो जिवंत आहे. हा सलोखा इथून पुढेही कायम ठेवू, असा निर्धार सर्व पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी येथे व्यक्त केला. लवकरच दलित संघटना व हिंदुत्ववादी संघटनांचा मेळावा घेऊन गैरसमज दूर करण्यात येतील, असे बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांनी सांगितले.
सामाजिक सलोखा कायम ठेवून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालय येथील पोलीस उद्यान येथे सद्भावना मेळावा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
होती. या मेळाव्यात शाहूंच्या
भूमीतील सलोखा कायम टिकवून ठेवण्याचा निर्धार सर्वांनी केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना विविध पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरची सामाजिक सलोख्याची वीण घट्ट असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी महापौर स्वाती यवलुजे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, रिपाइं (ए)चे पश्चिम महाराष्टÑ अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रिपाइं (गवई)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, ‘पीआरपी’चे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवास साळोखे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे, शहराध्यक्ष महेश उरसाल, ब्लॅक पॅँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई, राष्टÑवादी कॉँग्रेसचे आर. के. पोवार, कॉँग्रेसचे सुरेश कुराडे, ‘भाकप’चे नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, मल्हार सेनेचे बबन रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, बाळासाहेब भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, उद्योजक चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक मोहिते यांनी आभार मानले.
महाराष्टÑातील सामाजिक एकतेची वीण अत्यंत घट्ट आहे. त्यामुळे ही वीण विस्कटण्याचा प्रयत्न करणाºयांना त्यात कधीच यश मिळणार नाही. खूप मेहनतीने या देशाला अखंड ठेवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केला आहे. त्यामुळे सर्वजण गुण्या-गोविंदाने नांदूया. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अप्रिय घटना भविष्यात घडू नयेत यासाठी दक्ष राहूया.
-चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री
नवीन वर्षाची सुरुवात वाईट घटनेने झाली. अशा घटना परत होऊ नयेत आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी सद्भावना मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून एकात्मतेची बीजे रोवली जातील.
- विश्वास नांगरे-पाटील,
विशेष पोलीस महानिरीक्षक