बेकायदेशीर नोकरभरतीबाबत जाब विचारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:45 PM2019-09-07T12:45:33+5:302019-09-07T12:48:07+5:30
सभासदांनी नामंजूर स्टाफिंग पॅटर्न केलेला असताना, खोटे प्रोसीडिंग रचून प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. ही बेकायदेशीर भरती आणि अवास्तव खर्चाबाबत उद्या, रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जाब विचारण्याचा निर्धार प्राथमिक शिक्षक बँक बचाव कृती समितीने केला आहे, असे या समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी येथे सांगितले.
कोल्हापूर : सभासदांनी नामंजूर स्टाफिंग पॅटर्न केलेला असताना, खोटे प्रोसीडिंग रचून प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. ही बेकायदेशीर भरती आणि अवास्तव खर्चाबाबत उद्या, रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जाब विचारण्याचा निर्धार प्राथमिक शिक्षक बँक बचाव कृती समितीने केला आहे, असे या समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी येथे सांगितले.
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, सहकार आयुक्तांचे निकष आणि सभासदांचा विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी जवळपास ३० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यात त्यांचे आप्तेष्ट, नातेवाइकांचा समावेश आहे. या भरतीविरोधात समितीने सहकार आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
सेवेत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी ही पुढील टप्प्यात देण्याचा करार करून प्रत्यक्ष देणी या वर्षी मांडली नसल्याने बँकेचा ताळेबंद हा फसवा, खोटा आहे. त्यात प्रत्यक्षात दीड कोटीचा नफा दाखविलेला आहे. २२ कोटी रुपयांच्या भाग भांडवलाचे १२ अधिक दोन टक्क्यांनी डिव्हिडंडचे तीन कोटी आठ लाख रुपये होतात. अवास्तव खर्च आणि बेकायदेशीर नोकरभरतीविरोधात कृती समितीच्या वतीने सर्वसाधारण सभेमध्ये जाब विचारण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस महिला राज्याध्यक्ष वर्षा केनवडे, कृष्णात धनवडे, रविकुमार पाटील, कृष्णात कारंडे, सुनील पाटील, प्रमोद तौंदकर, सुरेश कांबळे, राजेंद्र पाटील, मारुती पाटील, संजय कुुंभार, विष्णू जाधव, बाजीराव पाटील, दीपक जगदाळे, अशोक चव्हाण, बाबा धुमाळ, आदी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांनी केलेला अवास्तव खर्च
सत्ताधाऱ्यांनी अवास्तव खर्च केला आहे. त्यात सन २०१४ ते २०१९ दरम्यान लीजलाईनवर ६३,५०,६५० रुपये, संगणक देखभाल-दुरुस्तीवर १,३१,९१८४५ रुपये, तर एटीएम व्यवस्थित चालू नसताना २०,१६,१६० रुपयांचा समावेश आहे. बँकेची निवडणूक मे २०२० मध्ये होणार असल्याने गेली चार वर्षे सभासदांना ठेवींवर योग्य व्याज दिलेले नाही. सभासदांना अगदी तुटपुुंजा डिव्हिडंड दिला आहे. सत्ताधाऱ्यांनी सभासदांची पिळवणूक केली असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केला.