हसन मुश्रीफांचा पराभव करूनच आमदार होणार, समरजित घाटगेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 01:18 PM2022-08-05T13:18:44+5:302022-08-05T13:20:04+5:30

कागल : राज्यात शिंदे फडणवीस -सरकार आल्यानंतर मला मंत्रिपद की आणखीन काय मिळणार? राज्यपाल कोट्यातून आमदारकी मिळणार काय? अशा ...

Will become MLA only after defeating Hasan Mushrif says Samarjit Ghatge | हसन मुश्रीफांचा पराभव करूनच आमदार होणार, समरजित घाटगेंचा निर्धार

हसन मुश्रीफांचा पराभव करूनच आमदार होणार, समरजित घाटगेंचा निर्धार

Next

कागल : राज्यात शिंदे फडणवीस -सरकार आल्यानंतर मला मंत्रिपद की आणखीन काय मिळणार? राज्यपाल कोट्यातून आमदारकी मिळणार काय? अशा चर्चा सुरू आहेत. मला काय द्यायचे याबद्दल आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पण, मी राज्यपाल कोट्यातून आमदार होणार नाही. हसन मुश्रीफ यांचा पराभव करूनच आमदार होणार आहे, असे उद्गगार भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.

कागल येथील शाहू सभागृहात आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, बाळ पाटील, पंडित चव्हाण, पंडित पाटील, आरपीआयचे प्रदीप मस्के, आदी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जनतेच्या विविध कामांसाठीच मी मुंबईला खेटे मारले. तालुक्यातील विद्यमान संजय गांधी निराधार योजना समिती बरखास्त झाली आहे. लवकरच नवीन समिती अस्तित्वात येईल.

लवकरच बूस्टर डोस

घाटगे म्हणाले, गेल्या काही दिवसांत मुश्रीफ गटातून काही प्रवेश आमच्या गटात झाले आहेत. हे त्यांना आता दोन डोस दिले आहेत. आता तिसरा प्रवेश म्हणजे बूस्टर डोस असेल. त्याचे नावही लवकरच समजेल. हे सर्व लोक आमची सत्ता आली म्हणून आलेले नाहीत.

Web Title: Will become MLA only after defeating Hasan Mushrif says Samarjit Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.