ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची चौकशी करणार : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:54 PM2019-07-28T13:54:47+5:302019-07-28T13:55:21+5:30

गेल्या पंचवीस वर्षांत दोन-अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे,

will investigate those who looted Maharashtra: Chandrakant Patil | ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची चौकशी करणार : चंद्रकांत पाटील

ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची चौकशी करणार : चंद्रकांत पाटील

Next

कोल्हापूर : गेल्या पंचवीस वर्षांत दोन-अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे, साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत, त्यांची चौकशी करणार असल्याची घोषणा महसूलमंत्री आणि भाजपा प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केली. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रानेच नव्हे तर देशानेही नवे राजकीय वळण घेतले आहे. आतापर्यंत नेहरू-गांधी घराण्याने देश चालवला आणि शरद पवार यांच्यासारख्यानी महाराष्ट्र चालवला.पवार खासदार, मुलगी खासदार, पुतण्या माजी मंत्री आणि आता रोहित पवार विधानसभा लढवणार ही घराणेशाही नव्या पिढीला मान्य नाही. म्हणून लोक मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही ज्यांना पक्षात घेत आहे त्यांना कोणतीही भीती दाखवण्याची गरज नाही. ते लोक स्वखुषीने भाजपमध्ये येत आहेत. आयकर धाडी किंवा ईडीचे छापे काय आठ दिवसांत टाकता येत नाहीत, त्यासाठी त्या यंत्रणा सहा-सहा महिने त्या प्रकरणाचा अभ्यास करत असतात. त्यामुळे पवार किंवा हसन मुश्रीफ नुसता कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या कारवाईबद्दल हरकत असेल तर न्यायालयात दाद मागावी, आम्ही काय कुणाला अडवलेले नाही. दोन्ही काँग्रेसमधील दोन अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटून नेल्याने मागच्या पाच वर्षांत आमचे सरकार हतबल होते. आता आपल्याला मजबूत सरकार आणायचे आहे. त्यासाठी नेटाने कामाला लागावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
––―――––―–―
आमदार क्षीरसागर यांनी फार जोशात राहू नये : महेश जाधव यांचा टोला
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने मातब्बर उमेदवारांना पराभूत केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी फार जोशात राहू नये, असा टोला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लगावला. शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदार असले तरी भाजपाच आज जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: will investigate those who looted Maharashtra: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.