मतदार याद्या निर्दोष व अचूक करणार : बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:41+5:302021-02-23T04:38:41+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने शहरातील ८१ प्रभागांच्या ...

Will make voter lists innocent and accurate: Balkwade | मतदार याद्या निर्दोष व अचूक करणार : बलकवडे

मतदार याद्या निर्दोष व अचूक करणार : बलकवडे

Next

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने शहरातील ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या गेल्या मंगळवारी (दि.१६ फेब्रुवारी) प्रसिद्ध केल्या आहेत. प्रारूप मतदार याद्या तयार करण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कमी कालावधी मिळाला असल्याने त्या घाईगडबडीत फोडण्यात आल्या. त्यामुळे सर्वच याद्यात मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. गेल्या सात दिवसांत तब्बल ९१२ हरकती प्राप्त झाल्या असून त्यामुळे प्रशासनही गडबडून गेले आहे.

भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह अनेक इच्छुक उमेदवारांनी महापालिका प्रशासनाकडे याद्याबाबत तक्रारी दिल्या आहेत. याद्या दुरुस्तीचा कालावधी फारच कमी असल्यामुळे योग्य न्याय मिळणार नसल्याने प्रारूप याद्याच रद्द कराव्यात, असा आग्रह वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी, प्रारूप मतदार याद्यांवर कितीही तक्रारी आल्या तरी या तक्रारींची योग्य दखल घेऊन तसेच खातरजमा करून त्या दुरुस्त केल्या जातील. रात्रंदिवस काम करून याद्या निर्दोष करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, असे सांगितले.

-९१२ हरकती प्राप्त, आज शेवटचा दिवस-

८१ प्रभागांतील प्रारूप याद्यांवर सोमवारअखेर ९१२ हरकती प्राप्त झाल्या आहेत. आज, मंगळवार हरकती घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आणखी काही हरकती आज प्राप्त होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक ३९८ हरकती या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागांच्या आहेत. त्याखालोखाल गांधी मैदान विभागीय कार्यालयाकडील २०५, राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडील १७०, तर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाकडील १३९ हरकतींचा समावेश आहे.

Web Title: Will make voter lists innocent and accurate: Balkwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.