मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 10:23 PM2023-09-10T22:23:42+5:302023-09-10T22:24:54+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार या दोन्ही गटांचे राज्यभर सभा सुरू आहेत.

Will Mushrif's embrace keep the ribs? Dhananjay Munde's Jitendra Awada's Tola | मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

googlenewsNext

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार या दोन्ही गटांचे राज्यभर सभा सुरू आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांनी केल्हापूरात सभा घेतली होती. आता कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरदायित्व सभा घेतली आहे. या सभेत अजित पवार गटातील नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टोला लगावला. 

आम्हीपण मराठ्याची औलाद, दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचे विरोधकांवर टीकास्त्र

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, काही दिवसापूर्वी कोल्हापुरात सभा झाली. या सभेत आमच्या सर्वांच्यावर आरोप झाले, आरोप करणारे कोण होते हे महत्वाच नव्हत, पण साहेबांसमोर आरोप करत होते हे महत्वाच होते. मुश्रीफ साहेबांवर कोण आरोप करत असेल तर करवीर नगरीतील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. कोल्हापूरच्या पायताणाची चर्चा झाली. ज्यांना कोल्हापूरच्या पायताणाची ओळखच नाही त्यांनी त्याबद्दल भाषा करावी. हे कोल्हापूर आहे पायताण कसं बनवायचं, ते पायात कसं घालायचं आणि पायातलं काढून योग्य वेळेला चुकल्यावर कुठं वाजवायचं तेही माहिती आहे. 

धनंजय मुंडे म्हणाले, 'ज्याने कुणी पायताणाची भाषा केली त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का? पण संस्कारहीन बोलणं सुरु, असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.

'आम्हीपण मराठ्याची औलाद, दबावाला भीक घालत नाही'

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोल्हापुरात होणारी उत्तरदायित्व सभा मझ्यासाठी महत्वाची आहे, कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे केंद्र कायम राहील आहे. सध्या बळीराजावर दुष्काळच सावट आहे हे दूर करावं ही  अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील अनेक भागात अजून म्हणाव तसा पाऊस झालेला नाही, असं सांगून पवार यांनी सभेला सुरुवात केली. राज्यात सर्व समाजासाठी काम सुरू आहे.

"काहीजण सांगतात अजित पवार आणि आमदारांवर दबाव होता म्हणून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हो आमच्यावर दबाव होता, लोकांची काम पूर्ण करण्यासाठी दबाव होता. अडिच वर्षात आम्ही सरकारमध्ये हाती घेतलेली काम पूर्ण करण्याचा दबाव होता. अनेकांच्या कामावर स्थगिती होती.मग काय आमची चूक झाली. दुसरा कुठलाही आमच्यावर दबाव नव्हता, आम्हीपण मराठ्याची औलाद आहोत, आम्हीही शेतकऱ्यांची मुल आहोत. आमची बदनामी करण्याच काम सुरू आहे.यात काही तथ्य नाही, असंही अजित पवार म्हणाले.  

Web Title: Will Mushrif's embrace keep the ribs? Dhananjay Munde's Jitendra Awada's Tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.