राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही : केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 09:11 AM2023-09-28T09:11:02+5:302023-09-28T09:11:25+5:30
नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर, पहिली आणि दुसरी ही पाच वर्षे प्री-प्रायमरीमध्ये घेतली जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शासनाकडून शाळांचे सर्वेक्षण सुरू झाले की वाड्या, वस्त्या, दुर्गम भागातील शाळा बंद करणार, ही आवई उठविणे चुकीचे आहे. एकही शाळा बंद केली जाणार नाही. उलट इंग्रजी शाळांसारखी सुविधा मराठी शाळांमध्ये निर्माण करून मराठी शाळा वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली. ते म्हणाले, नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर, पहिली आणि दुसरी ही पाच वर्षे प्री-प्रायमरीमध्ये घेतली जाणार आहेत.
कंपन्यांचा फंड शाळा दुरुस्तीसाठी
अनेक शाळांचे छत गळतात, इमारती नादुरुस्त आहेत, सोयीसुविधा नाहीत. दुसरीकडे कंपन्यांचा सीएसआर फंड वेगवेगळे शैैक्षणिक प्रयोग करण्यामध्ये वाया जातो. त्यापेक्षा शाळांच्या दुरुस्तीसाठी तो वापरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुसज्ज शाळा आणि शिक्षणाच्या सोयीसुविधा मिळतील, असे केसरकर म्हणाले.