थकबाकीसाठी घरगुती वीज खंडित करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 07:21 PM2021-02-01T19:21:45+5:302021-02-01T19:23:32+5:30

mahavitaran Kolhapur- लॉकडाऊन काळातील थकबाकीपोटी कोणाचीही घरगुती वीज खंडित केली जाणार नाही, अशी ग्वाही महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी दिली. हा राज्याचा प्रश्न असल्याने ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याच्या मागणीबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Will not disconnect household electricity for arrears | थकबाकीसाठी घरगुती वीज खंडित करणार नाही

 घरगुती वीज बिल माफ करा, या मागणीसाठी सोमवारी वीज बिल कृती समितीने महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांची भेट घेतली. यावेळी विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील, निवास साळोखे, सुभाष जाधव, बाबा इंदुलकर, आदी उपस्थित होते.  (छाया - आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्दे महावितरणची कृती समितीला ग्वाही सक्तीने वसूल कराल तर संघर्ष अटळ

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील थकबाकीपोटी कोणाचीही घरगुती वीज खंडित केली जाणार नाही, अशी ग्वाही महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी दिली. हा राज्याचा प्रश्न असल्याने ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याच्या मागणीबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करा, या मागणीसाठी सोमवारी वीज बिल कृती समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता निर्मळे यांची भेट घेतली. अनेक ठिकाणी घरगुती ग्राहकांकडे वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा सक्ती करत आहे. मोबाईलवरून नोटीस पाठवून वीज बिल भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे म्हणतात. जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही नियमित बिले भरणार नाही, असे महावितरणला कळविलेले आहे.

तरीही सक्ती करणार असाल तर आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा करून मीटिंग घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली असताना महावितरणने गडबडीने वसुली सुरू करणे योग्य नाही. यामुळे महावितरण कर्मचारी व ग्राहकांमध्ये संघर्ष होईल, असेही पाटील-किणीकर यांनी सांगितले.

सहा महिन्यांचे बिल सोडून १ ऑक्टोबरपासून नवीन बिले द्या, अशी मागणी बाबा पार्टे यांनी केली. याबाबत ऊर्जामंत्र्यांशी मीटिंग घडवून आणावी, असे सांगत वीज पुरवठा खंडित केला तर होणाऱ्या परिणामास महावितरण जबाबदार राहील, असा इशारा निवास साळोखे यांनी दिला. यावेळी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, सुभाष जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: Will not disconnect household electricity for arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.