..तोपर्यत गावात जाणार नाही, बेडगमधील आंबेडकरी समाजाचा माणगावात निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 03:35 PM2023-09-12T15:35:36+5:302023-09-12T15:38:50+5:30
'सरकारने मागणी मान्य करावी अन्यथा परिणाम भोगावे लागतील'
अभय व्हनवाडे
रूकडी/माणगाव : 'जोपर्यंत कमान उभा राहणार नाही तो पर्यत बेडग येथे आम्ही परतणार नाही, अशा ठाम निर्धार बेडग (ता. मिरज, जि. सांगली) येथील आंबेडकरी समाज बांधवांनी माणगाव (ता. हातकणगंले. जि. कोल्हापूर) येथे केले.
बेडग येथोल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी आंबेडकरी समाज ऐतिहासिक माणगाव येथोल डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जमला होता. अभिवादन करून याठिकाणापासून त्यांनी मुंबई मंत्रालयापर्यत पदयात्रा मोर्चास सुरूवात केली.
बेडग येथील कमानाचा वाद तीन महिन्यापासून धुमसतच आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कमान शासनातर्फे उभारण्याचा आश्वासन देवून ही बेडग येथील ग्रामस्थांनी गावात कोणत्याही महापुरूषाच्या नावे कमान उभी करायची नाही असा ठराव केला. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. बेडग येथे स्वागत कमान उभारण्याची मागणी आता राज्यातून होत आहे. आंबेडकरी समाजाची मागणी सरकारने मान्य करावी अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा माजी आमदार राजीव आवळे यांनी दिला.
दरम्यान आर.पी.आयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शासनाने लवकरात लवकर कमान उभी करावी अन्यथा कायदेशीर बाब निर्माण झाल्यास याची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा दिला. तेलगंण विभागांचे प्रभारी प्रभारक विनोद निकाळजे, अध्यक्ष अमर कांबळे, नंदकुमार शिंगे, मुरलीधर कांबळे, शिरीष मधाळे, नितिन गवळी, बापू सनदी, निलेश गवळी, प्रदिप बिराजे, साताप्पा बिराजे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
पदयात्रेस माणगाव गावचा पाठिंबा
बेडगहून जवळपास 1000 महिला व पुरुष माणगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास जमले होते. याठिकाणी माणगावचे सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार यांनी माणगाव ते मुंबई पदयात्रेस गावचा पाठिंबा जाहीर केला.