लाच घेणार नाही; देणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:52 AM2019-10-31T11:52:29+5:302019-10-31T11:55:11+5:30

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘लाच घेणार नाही आणि देणार नाही,’ अशी शपथ दिली.

Will not take bribe; Do not give | लाच घेणार नाही; देणारही नाही

लाच घेणार नाही; देणारही नाही

Next
ठळक मुद्देलाच घेणार नाही; देणारही नाहीजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

कोल्हापूर : दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘लाच घेणार नाही आणि देणार नाही,’ अशी शपथ दिली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, आपल्या देशाची आर्थिक, राजनैतिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे. या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्व संबंधित पक्ष जसे की सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्र यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येक नागरिकाने सावध राहायला पाहिजे. नेहमी प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकाबाबत वचनबद्ध असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे. ही शपथ केवळ घेण्यापुरतीच नसून ती सर्वांनी पाळावयाची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, महसूल तहसीलदार सुनीता नेर्लीकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.


शपथ
जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करीन. लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करीन. जनहितामध्ये कार्य करीन. व्यक्तिगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करीन. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन.
 

 

 

 

Web Title: Will not take bribe; Do not give

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.