पक्षांतराचा परिणाम सत्तांतरात होणार का?
By admin | Published: September 14, 2016 12:00 AM2016-09-14T00:00:59+5:302016-09-14T00:47:07+5:30
कारण-राजकारण गडहिंग्लज तालुका
जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या राष्ट्रवादीने तालुक्यातील पाचही जागा जिंकून पंचायत समितीची सत्तादेखील अबाधित राखली होती. त्यावेळी शिंदे-चव्हाण-हत्तरकी-कुराडे ही मंडळी राष्ट्रवादीविरोधात होती. केवळ गावा-गावांतील कार्यकर्त्यांची फळी आणि बाबा कुपेकरांच्या सक्षम नेतृत्वामुळेच राष्ट्रवादीने तालुक्यावरील वर्चस्व कायम ठेवले होते. कुपेकरांच्या पश्चात होणाऱ्या यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे शहापूकर-चव्हाणांचे स्वप्न आहे. मात्र, ‘पक्षांतर’च्या नव्या प्रयोगातून ‘सत्तांतर’चे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार का? यासाठी वाट पहावी लागणार आहे.
काही न देता कसा
फुलणार ‘कमळ’?
निलजी बंधाऱ्याखाली ‘चित्री’चे पाणी सोडण्याची आणि गडहिंग्लजच्या ‘एमआयडीसी’त मोठा प्रकल्प आणण्याची मागणी चव्हाणांनी तर उचंगी व आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच रखडलेले तालुका क्रीडासंकुल व प्रस्तावित गडहिंग्लज शहरातील नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्याची मागणी शहापूरकरांनी ‘दादां’कडे जाहीरपणे केली.
मात्र, दोघांच्याही एकाही मुद्याला स्पर्श न करताच ‘दादा’ पुण्याच्या कार्यक्रमाला निघून गेले. त्यामुळे नाट्यगृहाला मिळालेला ५ कोटींचा निधी परत गेल्यानंतरही आशेने मेळाव्याला आलेल्या ‘गडहिंग्लज’करांची घोर निराशा झाली.