मुंबईतील विविध रुग्णालयांच्या समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:17+5:302020-12-23T04:22:17+5:30
जयसिंगपूर : महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सुविधा आणि सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे आमचे ध्येय आहे. राज्य ...
जयसिंगपूर : महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सुविधा आणि सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे आमचे ध्येय आहे. राज्य सरकारच्या अखत्यारितील मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.
मुंबई मंत्रालय येथे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या अखत्यारितील मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्यांबाबत शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी राज्यमंत्री यड्रावकर यांची भेट घेत यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुंबईतील सेंट जॉर्जेस आणि गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसरात तुळस व अन्य औषधी वनस्पतींची लागवड करून ऑक्सिजन पार्क उभारणे, रुग्णालयातील औषध पुरवठा यासह अन्य उपाययोजना राबविणे असे अनेक प्रश्न मांडले. याबाबत आपण सकारात्मक असून, लवकरच हे सर्व प्रश्न सोडविले जातील. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाला यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबतचे आदेश मंत्री यड्रावकर यांनी दिले.
फोटो - २२१२२०२०-जेएवाय-०४
फोटो ओळ - मुंबई येथे मंत्रालय आढावा बैठकीत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.