शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला बळकटी देणार - येडीयुरप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:58+5:302021-06-05T04:17:58+5:30

बेळगाव येथील सुवर्ण सौधमध्ये शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री गोविंद करजोळ, परिवहन मंत्री लक्ष्मण ...

Will strengthen education and health sector - Yeddyurappa | शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला बळकटी देणार - येडीयुरप्पा

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला बळकटी देणार - येडीयुरप्पा

Next

बेळगाव येथील सुवर्ण सौधमध्ये शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री गोविंद करजोळ, परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी, अन्न नागरी पुरवठामंत्री उमेश कत्ती, महिला बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, मंत्री श्रीमंत पाटील, वरिष्ठ अधिकारी, आमदार उपस्थित होते.

बेळगाव जिल्ह्याची लोकसंख्या पाहता लसीकरण संख्या वाढवणार असून, याबाबत आरोग्य सचिवांना चर्चा करण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या स्थानिक समस्या आणि अहवाल तक्रारीबाबत पालक मंत्र्यांना कल्पना द्यावी, अशी सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

बिम्समधील प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिश्वास या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेदेखील मुख्यमंत्र्यांनी सभेत सांगितले. जिल्हा रुग्णालयातील मूलभूत सुविधा वाढवून २० के. एल. ऑक्सिजन घटकाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

उमेश कत्ती आणि गोविंद कारजोळ यांनी तालुकास्तरावरील इस्पितळामधील व्हेंटिलेटर दुरुस्ती करा, अशी मागणी केली. तिसरी लाट आल्यास बेड क्षमता वाढवण्यासाठी बसदेखील सज्ज असतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सवदी यांनी दिले.

बेळगाव जिल्ह्यात १४४ नवीन डॉक्टरांची नियुक्ती

मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्यात सात नवीन ऑक्सिजन निर्मिती प्लांट मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच या प्लांटचे काम सुरू केले जाईल, असे आरोग्यमंत्री डी. सुधाकर यांनी म्हटले आहे.

नवीन नियुक्ती केलेल्या १४४ डॉक्टरांपैकी ५४ स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती झाली आहे. देशात कर्नाटकात सर्वांत जास्त कोविड चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ३ कोटी चाचण्या केल्या आहेत, असेही ते म्हणाले.

जूनअखेरपर्यंत राज्याला ५८ लाख लस मिळणार आहेत. त्यामुळे लसीकरण समस्यादेखील सुटेल, असा विश्वास सुधाकर यांनी व्यक्त केला.

फोटो : बेळगावात सुवर्ण सौधमधील बैठकीत मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा, सोबत मंत्री गोविंद कारजोळ, आणि उमेश कत्ती आणि डी. सुधाकर.

Web Title: Will strengthen education and health sector - Yeddyurappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.