"अर्वाच्य बोलणाऱ्या भाजप नेत्यांची खासदारकी रद्द होणार का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:43 PM2023-03-24T20:43:46+5:302023-03-24T20:44:12+5:30

'देशात नवी संस्कृती रुजते, ती घातक'; राजू शेट्टींनी केली टीका

Will the privacy of BJP leaders who speak unspeakable be revoked Asks Raju Shetty | "अर्वाच्य बोलणाऱ्या भाजप नेत्यांची खासदारकी रद्द होणार का?"

"अर्वाच्य बोलणाऱ्या भाजप नेत्यांची खासदारकी रद्द होणार का?"

googlenewsNext

राजाराम लोंढे, कोल्हापूर : राहुल गांधी यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य भाजपमधील अनेक नेत्यांनी केली आहेत. त्यांच्यावर कोठे गुन्हा दाखल झाला, त्यांना न्यायालयाने शिक्षा केल्याचे ऐकीवात नाही. मग अर्वाच्य बोलणाऱ्या भाजप नेत्यांचीही खासदारकी रद्द होणार का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

"अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या काळात असे कोणी वक्तव केले आणि कारवाई झाली असती तर समजू शकलो असतो. गेल्या पाचसहा वर्षात भाजपच्या नेत्यांनी यापेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केली, शिव्या शाप दिले. त्यांच्यावर किती कारवाई झाली.  देशात नवी संस्कृती रुजत असून ती लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. म्हातारा मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावत आहे," अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

Web Title: Will the privacy of BJP leaders who speak unspeakable be revoked Asks Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.