यड्रावचे गावतळे पुनरुज्जीवित होणार का?

By admin | Published: July 10, 2017 12:24 AM2017-07-10T00:24:39+5:302017-07-10T00:24:39+5:30

यड्रावचे गावतळे पुनरुज्जीवित होणार का?

Will Yadrav's gaavlet revive? | यड्रावचे गावतळे पुनरुज्जीवित होणार का?

यड्रावचे गावतळे पुनरुज्जीवित होणार का?

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
यड्राव : सद्य परिस्थितीत सर्वत्र जलस्रोत निर्मितीस महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक संघटना, शासन, समाज, कार्यकर्ते यासाठीचे पूरक उपक्रम राबवीत असताना येथील नैसर्गिक गावतळ्याचा जीर्णाेद्धार करून त्यास पुनरुज्जीवित करणे यामुळे गावातील इतर जलस्रोतांना पाझराने पाणी पातळी वाढू शकते. यासाठी लोकप्रतिनिधींच्या पुढाकारास महत्त्व आहे.
येथील गावतळ्याच्या पाण्याचा वापर कपडे धुणे, जनावरांसाठी व इतर उपयोगासाठी होत होता. तळ्यात साठणारे पाणी पाझर होऊन परिसरातील विहिरींना पाण्याची कमतरता भासत नव्हती. तळ्यामध्ये पाणी कमी झाले तर पंचगंगा साखर कारखान्याच्या सिंचन नलिकेमधील पाणी तळ्यात सोडून पाणी पातळी योग्य राखली जात होती.
सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे बऱ्याच दिवसांपासून तळे कोरडे पडले आहे. यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. तळ्याशेजारी कुमार विद्यामंदिर शाळा असल्याने कचऱ्याची दुर्गंधी व त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
तळ्याचे सुशोभीकरण करून तेथे ग्रामस्थांसाठी नाना-नानी पार्क, पदपथ, खत प्रकल्प उभारण्याचा यापूर्वी ग्रामपंचायतीने केलेला ठराव फक्त कागदोपत्रीच राहिला आहे. गावतळे सुशोभित झाल्यास परिसर नयनरम्य होऊ शकतो. बाजूलाच ग्रामदैवत लक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. त्याठिकाणी येणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ होऊ शकतो. तळ्याशेजारी असलेल्या स्मशानभूमीसही संरक्षक भिंत नसल्याने तेथील अनावश्यक साहित्य तळ्यात पडते.
शासन पातळीवर पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार सामाजिक संघटनाच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सहभागातून सातारा-खटाव परिसरात वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने पाणीस्रोत उभे राहिले आहे. सांगलीच्या पूर्व भागात ग्रामस्थांच्या सहभागाने या नदीची रुंदी वाढवून गाळ काढून प्रवाह मोठा बनला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीचा प्रवाह रुंदीकरणाचे सुमारे सहा किलोमीटरचे काम ग्रामस्थांचा सहभाग व दानशुरांचे सहकार्य यातून होत आहे. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे गावतळ्याचे पुनरुज्जीवन करण्यात येऊन त्याचे सुशोभीकरण केल्याने गावच्या सौदर्यांत भर पडली
आहे.
गावतळ्याची खोली, रुंदी वाढवून पाणीसाठ्याची क्षमता वाढविल्यास पावसाचा पाणीसाठा जलस्रोत वाढीस पूरक ठरणार आहे. गावतळे शासन दरबारी नोंदीची उलट-सुलट चर्चा असताना ग्रामस्थांच्या व सार्वजनिक हितापुढे शासकीय नोंदीचे महत्त्व कमी आहे. यड्राव परिसरात मोठमोठे उद्योग आहेत. येथील दानशूर मंडळी समाजहिताच्या कार्यात सहभागी होऊ शकतील. यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरज आहे.

Web Title: Will Yadrav's gaavlet revive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.