विनय कोरेंच्या सुपूत्राने जिंकला कुस्तीचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:28 AM2018-12-14T11:28:50+5:302018-12-14T11:39:06+5:30

राजकारणाच्या आखाड्यात जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे गेली अनेक वर्षे आहेत. येणाऱ्या काळात त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य राजकारणाच्या आखाड्यात जाणार की नाही, हे माहित नाही, पण कुस्तीच्या आखाड्यात मात्र त्यांनी मैदान मारले आहे.

Winnie Correa's conquest wrestling wanderer | विनय कोरेंच्या सुपूत्राने जिंकला कुस्तीचा आखाडा

विनय कोरेंच्या सुपूत्राने जिंकला कुस्तीचा आखाडा

googlenewsNext
ठळक मुद्देविनय कोरेंच्या सुपूत्राने जिंकला कुस्तीचा आखाडाराष्ट्रीय विजेता पहिलवान रविंद्र कुमार यांच्याशी लढत

वारणानगर : राजकारणाच्या आखाड्यात जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे गेली अनेक वर्षे आहेत. येणाऱ्या काळात त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य राजकारणाच्या आखाड्यात जाणार की नाही, हे माहित नाही, पण कुस्तीच्या आखाड्यात मात्र त्यांनी मैदान मारले आहे.

कोरे कुंटुबियांने कुस्तीवरील प्रेम आणि श्रध्दा आजवर कायम जपली आहे. मल्लविद्येला कायम प्रेरणा देणाऱ्या या कोरे कुंटुबातच हा मल्ल तयार झाला आहे. सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या २४ व्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे वारणानगर येथे भरविण्यात येणाऱ्या कुस्त्यांच्या मैदानात ज्योतिरादित्य यांनी प्रेक्षणीय कुस्ती केली.

ज्योतिरादित्य यांनी अवघ्या विसाव्या सेकंदात राष्ट्रीय विजेता पहिलवान रविंद्र कुमार यांच्याशी लढत करून त्याच्यावर मात करून विजय मिळवला.

Web Title: Winnie Correa's conquest wrestling wanderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.