‘रेसिडेन्सी क्लब’चा नावलौकिक वाढवणार-- ‘लोकमत’ला सदिच्छा भेट; आऊटडोअर गेमसाठी प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:14 AM2017-10-12T01:14:22+5:302017-10-12T01:16:12+5:30

कोल्हापूर : देशभरातील ४३ क्लबशी करारबद्ध असलेल्या ‘रेसिडेन्सी क्लब’ची असलेली प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी निवडणुकीत उतरलो होतो

Wishing the reputation of 'residency club' - welcome to Lokmat; Outdoor games will be set up for the game | ‘रेसिडेन्सी क्लब’चा नावलौकिक वाढवणार-- ‘लोकमत’ला सदिच्छा भेट; आऊटडोअर गेमसाठी प्रकल्प उभारणार

‘रेसिडेन्सी क्लब’चा नावलौकिक वाढवणार-- ‘लोकमत’ला सदिच्छा भेट; आऊटडोअर गेमसाठी प्रकल्प उभारणार

Next
ठळक मुद्दे नूतन संचालकांची ग्वाही :पुणे, मुंबई, राजस्थान, कर्नाटक, गोवा येथील ४३ क्लबशी करार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशभरातील ४३ क्लबशी करारबद्ध असलेल्या ‘रेसिडेन्सी क्लब’ची असलेली प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी निवडणुकीत उतरलो होतो. सभासदांनी आमच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने क्लबचा नावलौकिक वाढवणारा कारभार करू, अशी ग्वाही नूतन संचालकांनी दिली.

‘रेसिडेन्सी क्लब’च्या निवडणुकीत ‘प्रोगे्रसिव्ह ग्रुप १९९२’चे १५ पैकी १३ उमेदवार विजयी झाले. या नूतन संचालकांनी बुधवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन संपादक वसंत भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या आघाडीचे नेते सतीश घाटगे म्हणाले, मतदारांसमोर एक भूमिका घेऊन गेलो. कुठेही नकारात्मक प्रचार करायचा नाही, कुणावरही आरोप करायचा नाही, असेही आम्ही निश्चित केले होते. मात्र, आमच्या मंडळींवर बिनबुडाचे आरोप झाल्यानंतर आम्ही त्यालाही संयमी भाषेत उत्तर दिले.

आता सत्तारूढ आणि विरोधक असा विषय राहणार नाही. सर्वजण एकदिलाने काम करणार आहोत. ‘रेसिडेन्सी प्रेस्टीन’ हा एक प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर आहे. शहराबाहेर मोठी जागा घेऊन तेथे आऊटडोअर गेम सुरू करण्याचा मानस आहे. सध्या क्लबमध्ये केवळ इनडोअर गेम सुरू आहेत. मात्र, क्लब हा मुळात खेळासाठीच होता याची जाणीव ठेवत कोल्हापूरच्या युवा खेळाडूंना घडविण्यासाठी हा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी आमच्याकडे सध्या असलेल्या १५ प्रशिक्षकांनाच अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रकल्प सभासदांनादेखील तो पसंतीस पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

माजी सचिव अमर गांधी म्हणाले, विरोधकांनी प्रचारावेळी एकच बाजू सांगितली. त्यांनी केवळ जावक नोंदवहीतील माहिती दिली. आवक नोंदवहीतील माहिती दिली नाही; परंतु सूज्ञ सभासदांनी निर्णय दिला आहे. सध्या क्लबमध्ये १0 खोल्या आहेत. आणखी नऊ खोल्यांचे काम सुरू आहे. पुणे, मुंबई, राजस्थान, कर्नाटक, गोवा येथील ४३ क्लबशी करार केला असल्याने अनेक मान्यवर क्लबची सेवा घेतात. त्या दर्जेदार असल्याचा अभिप्राय मिळत आहे. सभासदांच्या मुलांनाही सेवा देण्यात येणार आहे.
चर्चेत ॠतुराज इंगळे, संचालक नरेश चंदवाणी, शीतल भोसले, विक्रांत कदम, केदार हसबनीस, बसवराज खोबरे यांनी भाग घेतला. यावेळी सचित गांधी उपस्थित होते.

कोल्हापूर येथील ‘रेसिडेन्सी क्लब’च्या नूतन संचालकांनी बुधवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संचालक शीतल भोसले, विक्रांत कदम, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, अमर गांधी, सतीश घाटगे, ॠतुराज इंगळे, नरेश चंदवाणी, केदार हसबनीस, सचित गांधी उपस्थित होते.

Web Title: Wishing the reputation of 'residency club' - welcome to Lokmat; Outdoor games will be set up for the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.