Kolhapur: 'लकी ड्रॉ'चे आमिष दाखवून घातला लाखोंचा गंडा, धामोड येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:30 PM2024-03-19T13:30:53+5:302024-03-19T13:32:43+5:30
धामोड: येथील शिवाजी गल्ली मध्ये दोन महिला व एक पुरुष अशा तिघांनी सेल्समन असल्याचे भासवून जवळपास पंचवीस महिलांना एक ...
धामोड: येथील शिवाजी गल्ली मध्ये दोन महिला व एक पुरुष अशा तिघांनी सेल्समन असल्याचे भासवून जवळपास पंचवीस महिलांना एक लाख रुपयाचा गंडा घालून गावातून पोबारा केल्याची घटना आज काल, सोमवारी घडली.
आम्ही रोहन मार्केर्टिंग गडमुडशिंगीमध्ये काम करत आहोत. कोल्हापुरातील एका मोठया दुकानाच्या जाहिरातीसाठी आलो आहोत. दुकानाची नविन ओपनिंग होणार आहे त्याची जाहिरात म्हणून आज आपल्या गावात मोठा लकी ड्रॉ होणार आहे. जो आत्ता कुपन काढेल त्यांनाच लकी ड्रॉ मध्ये सहभागी होता येईल असे सांगितले.
दोन महिला सेल्समननी घरोघरी फिरून शंभर रुपया पासून ते पाच हजार रुपया पर्यंतच्या पावत्या केल्या. व त्या मोबदल्यात टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशीन, मिक्सर, कुकर' अशा गृहोपयोगी वस्तू असल्याचे सांगितले. अन् दुपारी बारा वाजता या लकी ड्रॉ'च्या सोडतीसाठी बाजारपेठ चौकात उपस्थित राहण्यास सांगितले.
गावातून जवळपास लाखोंची रक्कम वसूल करून संशयित तिघांनी गावातून पळ काढला. त्यांनी सांगितलेल्या वेळेला महिला गावातील चौकात जमल्या असता तिथे कोणीही नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अद्याप या घटनेबाबत राधानगरी पोलिसात गुन्हा नोंद नाही.