प्रस्तावित घरफाळा, पाणीपट्टी वाढ मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:27 AM2021-02-09T04:27:37+5:302021-02-09T04:27:37+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावित घरफाळा तसेच पाणीपट्टी वाढ मागे घ्यावी, अशी मागणी सोमवारी भाजप ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी ...

Withdraw the proposed house tax, water bill increase | प्रस्तावित घरफाळा, पाणीपट्टी वाढ मागे घ्या

प्रस्तावित घरफाळा, पाणीपट्टी वाढ मागे घ्या

Next

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावित घरफाळा तसेच पाणीपट्टी वाढ मागे घ्यावी, अशी मागणी सोमवारी भाजप ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी सोमवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

शहरवासीयांवर आधीच फरफाळा बेकायदेशीर व चुकीच्या पध्दतीने आकारला गेल्यामुळे नाहक बोजा पडलेला आहे. घरफाळा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे शहरातील अनेक मिळकतींचा घरफाळा शून्य केला आहे. अनेक इमारतींना अद्याप घरफाळा लावण्यात आलेला नाही. शहरात अनेक ठिकाणी विनामीटर पाण्याचा वापर होत आहे, पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात आहे. या त्रुटी दूर केल्या तर करवाढ करावी लागणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

प्रशासक बलकवडे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, राजसिंह शेळके यांचा समावेश होता.

Web Title: Withdraw the proposed house tax, water bill increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.