सरकारच्या मदतीशिवाय ‘सुवर्ण सिंहासन’ साकारणार-संभाजीराव भिडे-गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:13 PM2017-11-16T23:13:29+5:302017-11-16T23:23:20+5:30

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीशिवाय रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल.

Without the help of the government, the 'Golden Throne' will be implemented - Sambhajirao Bhide-Guruji | सरकारच्या मदतीशिवाय ‘सुवर्ण सिंहासन’ साकारणार-संभाजीराव भिडे-गुरुजी

सरकारच्या मदतीशिवाय ‘सुवर्ण सिंहासन’ साकारणार-संभाजीराव भिडे-गुरुजी

Next
ठळक मुद्देपावणेदोन वर्षांत काम पूर्ण करणार हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी शिवरायांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. यासाठी शिवचरित्र, संभाजी महाराज यांचे चरित्र अभ्यासले पाहिजे.शिवरायांचे विचार जपणाºया पिढीची आज गरज आहे. हिंदू समाजाला राष्ट्रीयत्वाची गरज आहे.राष्ट्रीयत्व निर्माण करण्यासाठी हिंदू समाजाने आपल्या परंपरा, संस्कृतीचे जतन केले पाहिजे.

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीशिवाय रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. हिंदू समाजाच्या मदतीवर येत्या पावणेदोन वर्षांत या सिंहासनाचे काम पूर्ण केले जाईल, असे प्रतिपादन संभाजीराव भिडे-गुरुजी यांनी गुरुवारी येथे केले.

येथील बिंदू चौकामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘३२ मण सुवर्ण सिंहासन पुनरपी प्रतिष्ठान’ असा होता. यात संभाजीराव भिडे-गुरुजी म्हणाले, रायगडावर साकारण्यात येणारे हे ३२ मण सुवर्ण सिंहासन पुन्हा हिंदवी स्वराज्य घडविण्यासाठी स्फूर्ती देईल. त्यामुळे या सिंहासनाच्या पुनरपीसाठी हिंदू समाजाने मदतीचा हात द्यावा. राष्ट्रीयत्वाची जाण असलेल्या लोकांनी राष्ट्रीयीकृत बँकेतील प्रतिष्ठानच्या खात्यावर चलनाद्वारे मदत जमा करावी. प्रत्येक तरुणाने किमान एक ग्रॅम सोने द्यावे. या व्याख्यानाच्या प्रारंभी संभाजीराव भिडे-गुरुजी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर अध्यक्ष शरद माळी, आशिष लोखंडे, सुरेश यादव, सुधाकर सुतार , बंडा साळोखे, शिवानंद स्वामी, रोहित अतिग्रे, अतुल शिंदे, रोहित पाटील, अभिषेक जाधव, प्रथमेश मोरे, आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात गुरुवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित व्याख्यानात संभाजीराव भिडे-गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
कोल्हापुरात गुरुवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संभाजीराव भिडे-गुरुजी यांचे व्याख्यान झाले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Without the help of the government, the 'Golden Throne' will be implemented - Sambhajirao Bhide-Guruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.