दुचाकीवरून पडल्याने आरेतील महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:23+5:302020-12-13T04:37:23+5:30

कोल्हापूर : समोरून येणाऱ्या मोटारकारला चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्याने पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाल्या. लता मधुकर ...

A woman in Aarey was seriously injured after falling from a bike | दुचाकीवरून पडल्याने आरेतील महिला गंभीर जखमी

दुचाकीवरून पडल्याने आरेतील महिला गंभीर जखमी

Next

कोल्हापूर : समोरून येणाऱ्या मोटारकारला चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्याने पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाल्या. लता मधुकर वरुटे (वय ३५, रा. आरे, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात आरे ते सडोली खालसा या मार्गावर भटकी नावाच्या वळणावर घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मधुकर धोंडीराम वरुटे (४५, रा. आरे) हे आपली पत्नी लता वरुटे व सहा महिन्यांच्या रुद्र या बालकास घेऊन आरेहून कारभारवाडीकडे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मोटारकारची धडक चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी रस्त्यावरून घसरली. दुचाकीच्या मागे बसलेल्या लता वरुटे यांच्या डोक्याला मुका मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. अपघातात अविचाराने व हयगयीने दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल मधुकर वरुटे यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

(तानाजी)

Web Title: A woman in Aarey was seriously injured after falling from a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.