वैरणीचा भारा मानेवर पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:59+5:302021-09-15T04:29:59+5:30
अधिक माहिती अशी, गुरुवारी (दि. ९) सायंकाळी रेखा मांडे या ‘माळ’ नावाच्या शेताकडे वैरण आणण्यासाठी गेल्या होत्या. वैरणीचा भारा ...
अधिक माहिती अशी, गुरुवारी (दि. ९) सायंकाळी रेखा मांडे या ‘माळ’ नावाच्या शेताकडे वैरण आणण्यासाठी गेल्या होत्या. वैरणीचा भारा डोक्यावरून आणताना त्यांचा पाय घसरल्याने भारा मानेवर पडला. उपचारासाठी त्यांना गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक मृत्यूने मांडे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. कर्तृत्ववान स्त्रीच्या मृत्यूने मांडे कुटुंब हतबल झाले आहे. रेखा यांच्या पश्चात पती, सासू, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
शेतीमध्ये मोलमजुरी करून रेखाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत संसार सावरला होता. रेखाचे पती नारायण मांडे हे लोककलावंत, कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते शाळा कॉलेजमध्ये आपली कला सादर करून कुटुंबाला हातभार लावत होते. परंतु कोरोनाकाळात लॉकडाऊन परिस्थितीत शाळा बंद असल्याने गेले अडीच वर्षे कार्यक्रमही बंद आहेत. त्यामुळे मांडे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. नारायण भेळ, चिरमुरे विकून तर रेखा शेतात मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होते. गुरुवार कुटुंबाचा काळा दिवस ठरला.