माजगाव फाट्याजवळ छोटा हत्ती उलटून महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:57+5:302021-05-05T04:37:57+5:30
घटनास्थळावरून मिळालेला माहिती अशी, कोल्हापूरहून किराणा माल घेऊन उंड्रीकडे निघालेल्या छोटा हत्ती गाडीला पंचगगा पूल थांब्यावरून त्या गाडीला हात ...
घटनास्थळावरून मिळालेला माहिती अशी, कोल्हापूरहून किराणा माल घेऊन उंड्रीकडे निघालेल्या छोटा हत्ती गाडीला पंचगगा पूल थांब्यावरून त्या गाडीला हात करून पूजा चव्हाण, पती संभाजी आणि सासू उंड्री गावाकडे निघाले होते. कोतोली-नांदगाव रोडवरील माजगाव फाट्यानजीकच्या रस्त्यावरून वेगवान गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने, गाडीने तीन झोले खात डाव्या बाजूला रस्त्यावर पलटी झाली. डाव्या बाजूला बसलेल्या पूजा यांना हातापायाला व चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. पूजा चव्हाण यांची पंचगंगा हाॅस्पिटलमध्ये तीन दिवसांपूर्वी प्रस्तूती झाली होती. दवाखान्यातून प्रस्तूतीनंतर डिस्चार्ज घेऊन घराकडे निघाल्याने वाटेत अपघात झाल्याने परत त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले.
केवळ दैव बलवत्तर म्हणून...
कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने गावाकडे जाण्यासाठी दवाखान्यातील रुग्णांना मिळेल त्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो. तीन दिवसांचे बाळ कडेवर घेऊन चारचाकी गाडीतून पूजा चव्हाण कडेच्या डाव्या बाजूच्या सीडीवर बसल्या होत्या. अपघातात गाडी डाव्या बाजूलाच पलटी झाली. आईने स्वत:ला धोक्यात घातले; पण बाळाला पोटाशी कवटाळून धरले होते. केवळ दैव बल्वत्तर म्हणून गाडी पलटी होऊन घसरत गेलेल्या धक्क्यात बाळाला काहीच झाले नाही.