कोल्हापूर: पाडळी खुर्द येथे शेतवडीत महिलेचा खून, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 02:24 PM2022-09-30T14:24:18+5:302022-09-30T16:59:13+5:30

खूनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही

Woman killed in farm at Padali Khurd Kolhapur district | कोल्हापूर: पाडळी खुर्द येथे शेतवडीत महिलेचा खून, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

कोल्हापूर: पाडळी खुर्द येथे शेतवडीत महिलेचा खून, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

googlenewsNext

प्रकाश पाटील

कोपार्डै : पाडळी खुर्द ता. करवीर येथे शेतवडीत महिलेचा डोक्यात वीट घालून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल, गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आज, शुक्रवारी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. खूनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

खून झालेल्या महिलेजवळ आधार कार्ड आढळून आले. त्यावरुन तिचे नाव आरती अनंत सामंत (वय ४५, रा शुक्रवार पेठ कोल्हापूर) असल्याची माहिती समोर आली आहे. खूनाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. करवीरचे पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक अजय शेंडकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आरती सामंत या काल सायंकाळी आपल्या आईला सांगून देवदर्शनासाठी म्हणून घराबाहेर पडल्या होत्या. त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्याच नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नव्हता. आज, सकाळी पाडळी खुर्द व कोगे दरम्यान असलेल्या बिगा नावाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात  पाठीमागील बाजूस मोठी जखम झाली होती. तर नाकातून रक्त आले होते. शेजारी रक्ताने माखलेली वीट होती

Web Title: Woman killed in farm at Padali Khurd Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.