मधमाशांच्या हल्ल्यात वझरे येथील वृद्ध महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 03:49 PM2021-12-18T15:49:58+5:302021-12-18T15:50:44+5:30

मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात आजरा तालुक्यातील वझरे येथील एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली.

Woman seriously injured in bee attack in Ajara taluka kolhapur district | मधमाशांच्या हल्ल्यात वझरे येथील वृद्ध महिला गंभीर जखमी

मधमाशांच्या हल्ल्यात वझरे येथील वृद्ध महिला गंभीर जखमी

googlenewsNext

महागोंड : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात आजरा तालुक्यातील वझरे येथील एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. शांताबाई सदु गुरव (वय ६०) असे या जखमी महिलेचे नाव आहे. शांताबाई या शेताकडे नाचना कापण्यासाठी गेल्या असता ही घटना आज, सकाळच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, शांताबाई या एकट्याच नाचना कापण्यासाठी शेतात गेल्या होत्या. शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांपासून बचाव करीत त्या रस्त्यांच्या कडेला येवून थांबल्या. रस्त्यावरून जा-ये करणाऱ्या ग्रामस्थांना ही घटना निदर्शनास येताच त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला.

तत्पुर्वी ग्रामस्थांनी त्यांना खासगी वाहनातून महागोंड पर्यंत नेले. तेथून त्यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले. मात्र मधमाशांनी अधिक हल्ला केल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Woman seriously injured in bee attack in Ajara taluka kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.