राजारामपुरीत महिलेची चेन ‘धूम स्टाईल’ने लंपास: भर दिवसा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:38 PM2019-06-03T13:38:55+5:302019-06-03T13:39:51+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्ली येथील दत्ताजी पार्क रोडवर फिरण्यासाठी पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन ...

The woman's chain 'Dhoom Styles' lapsed in Rajarampur: The day-to-day type | राजारामपुरीत महिलेची चेन ‘धूम स्टाईल’ने लंपास: भर दिवसा प्रकार

राजारामपुरीत महिलेची चेन ‘धूम स्टाईल’ने लंपास: भर दिवसा प्रकार

Next
ठळक मुद्देराजारामपुरीत महिलेची चेन ‘धूम स्टाईल’ने लंपासदीड तोळे वजनाच्या सोन्याच्या चेनची चोरी : भर दिवसा प्रकार

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्ली येथील दत्ताजी पार्क रोडवर फिरण्यासाठी पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने हिसडा मारून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १) सायंकाळी गजबजलेल्या ठिकाणी घडली. याबाबत शर्मिष्ठा रामराव नलवडे (रा. घर. नं. २०१९ इ वॉर्ड, दत्त छाया बंगला, राजारामपुरी नववी गल्ली) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, शर्मिष्ठा नलवडे ह्या शनिवारी सायंकाळी दत्ताजी पार्क बिंल्डिंगच्या रोडवरून फिरण्यासाठी पायी जात होत्या. त्याचवेळी समोरून दुचाकीवरून भरधाव वेगाने दोन व्यक्ती आल्या.

त्यापैकी पुढे दुचाकी चालविण्यासाठी बसलेल्या, हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने नलवडे यांच्या गळ्याला हिसडा मारून त्यांची दीड तोळे वजनाची सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लांबवली. दुचाकीस्वाराच्यामागे बसलेल्या युवकाने तोंडावर पांढरा रूमाल बांधला होता.

यावेळी सायंकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ होती, नलवडे यांनी आरडा-ओरडा केला; पण चोरटे धूम स्टाईलने वेगाने पळून गेले. याबाबत नलवडे यांनी शनिवारी रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 

 

Web Title: The woman's chain 'Dhoom Styles' lapsed in Rajarampur: The day-to-day type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.