बसमध्ये चढताना महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 08:00 PM2018-06-03T20:00:27+5:302018-06-03T20:00:27+5:30

आयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंग रोडवर केमटी बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसडा मारून लंपास केले.

The woman's two-and-a-half knuckle hanging on the bus | बसमध्ये चढताना महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लंपास

बसमध्ये चढताना महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लंपास

googlenewsNext

कोल्हापूर : आयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंग रोडवर केमटी बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसडा मारून लंपास केले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु ते धूम स्टाईलने पसार झाले. 

अधिक माहिती अशी, शिला गजानन निकम (वय ५५, रा. शाहुपुरी पाचवी गल्ली) ह्या रविवारी सकाळी आयोध्या कॉलनी, फुलेवाडी येथे राहणारी मुलगी रुपाली अजित जाधव यांच्याकडे गेल्या होत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परत जाण्यासाठी त्या रिंग रोडवरील बसस्टॉपवर उभ्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ 22 वर्षांचा अनोळखी तरुण येऊन उभा राहिला. बराच वेळ तो उभा असलेने निकम यांना शंका आली. त्यांनी तू महिलांच्या जवळ का थांबून आहेस, निघून जा असे म्हणाल्या. त्यावर त्याने रंकाळ्यावर निघालोय, बसची वाट पाहत आहे, असे सांगितले.

काही वेळाने बोंद्रेनगरहून मध्यवर्ती बसस्थानकडे जाणारी केएमटी बस आली. निकम बसमध्ये चढत असताना त्या तरुणाने त्यांच्या गळ्यात हात घालून गंठण हिसकावून घेतले. यावेळी निकम यांनी एका हाताने गंठण धरल्याने ते अर्धवट तुटून चोरट्याच्या हाती लागले. चोर..चोर म्हणून त्यांनी आरडाओरड करताच संबंधित तरुण बसपासून काही अंतर पुढे धावत गेला. समोर दुचाकीवरून तरुण वाट पाहत थांबला होता. त्यावर बसून दोघे जण धूमस्टाईलने रंकाळ्याच्या दिशेने पसार झाले. काही नागरिकांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला असता ते मिथून आले नाहीत. नागरिकांनी या घटनेची माहिती करवीर पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु होता. याप्रकरणी रात्री उशीरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

Web Title: The woman's two-and-a-half knuckle hanging on the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.