कष्टाच्या कामात महिलाही एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:38+5:302021-02-25T04:29:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : कष्टाच्या रोजंदारी कामात पुरुष पुढे असले, तरी या कामात महिला काही कमी ...

Women also take a step forward in hard work | कष्टाच्या कामात महिलाही एक पाऊल पुढे

कष्टाच्या कामात महिलाही एक पाऊल पुढे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : कष्टाच्या रोजंदारी कामात पुरुष पुढे असले, तरी या कामात महिला काही कमी नाहीत. घाम गाळून मिळेल तो रोजगार करून महिला संसार फुलवत आहेत. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले, माजगाव, यवलूज, माळवाडी यांसह अन्य गावांतील महिला उसाच्या मोळ्या बाहेर काढणे, खत भरणे, शेतात टाकणे, शेतात नाळ मारणे यासारखी अनेक रक्ताचे पाणी करणारी कामे मनगटाच्या ताकदीवर करताना दिसतात.

सध्या ऊस ओढायला मनुष्यबळच मिळत नसल्याने काही शेतकरी ऊस ओढण्यासाठी रोजगारी महिलांची मदत घेत आहेत. यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने, बहुतांशी शिवारात ऊस डोक्यावरून वाहून आणला जात आहे.

शिवारातील वाटेकडचा ऊस सहज उचलला जातो; परंतु आतील ऊस वाहूनच रस्त्यावर वाहनात भरला जातो. पूर्वी पैरा किंवा पावणेर पध्दतीने ऊस डोक्यावरून बाहेर वाहून आणला जात होता. कष्टाचे काम करण्याची सर्वांचीच मानसिकता नसल्यामुळे पुरेसे मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे शेतातील काम वेळेत होत नाहीत, अशी शेतकऱ्यांची ओरड असते. फडातून ऊस रस्त्यावर आणण्यासाठी पुरुषांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे रोजगारी महिला ऊस ओढण्याचे काम करताना शिवारात दिसत आहे.

महागाईत दिवसा पाच-पन्नास रुपये रोजगारावर संसार चालविणे म्हणजे शेती नसलेल्या महिलांसाठी तारेवरची कसरत. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले, माजगाव, यवलूज आणि माळवाडी यांसह अन्य गावांतील काही रोजगारी महिलांनी संसाराची परवड थांबविण्यासाठी रक्ताचे पाणी करणारी कष्टाची कामे महिलांनी मनगटाच्या शिरावर हाती घेतली. प्रति मोळी ३ ते ८ रुपये अथवा तासावर रोजगार किंमत ठरली जाते. सकाळ ते संध्याकाळपर्यंत हजारच्यावर उसाच्या मोळ्या काढण्याची उमेद परिस्थितीच्या जाणिवेतून होत असल्याच्या त्या महिला अभिमानाने सांगतात. ऊस ओढण्याचा व्यवहार अंतरावरून ठरत असला, तरी शेतकऱ्याला परवडेल या जाणिवेतून रोजगाराची आकडेमोड होते.

कोट....

शेतात दिवसभर राबले तर १०० रुपयावर एक रुपयाही मिळत नव्हता. परंतु ऊस ओढण्यासह अन्य कष्टाची कामे त्या करू लागल्यापासून दिवसा चार-पाचशे पदरात पडतात. कष्टाचे काम करताना अंगाची झीज होते;परंतु मिळणाऱ्या कामाचा मोबदला कामासाठी बळ देतो.

भारती माने, माजगाव (ता. पन्हाळा)

Web Title: Women also take a step forward in hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.