महिलांचाही गरजवंतासाठी आहे मदतीचा हात; स्वामिनी वस्तीस्तर संस्थेचीही बहुमूल्य साथ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:33 AM2020-04-23T11:33:19+5:302020-04-24T11:51:01+5:30
यापुढेही कोरोनाचे संकट संपेपर्यत हे छोटेस मदतकार्य सुरुच ठेवणार असल्याचे सर्व सदस्यांनी स्पष्ट केले. महिलांना विशेषत: महिन्याचे जिन्नस पुरेसे मिळालेल की समाधान मिळते, तसेच घरातील थोड्याशा गरजा ही भागविल्या जातात म्हणून ही मदत
कोल्हापूर : कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर शहरातील कमदवाडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्वामिनी वस्तीस्तर संस्थेच्या पदाधिकारी व सर्व सदस्या महिलांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गरजवंताना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत खारीचा वाटा उचलला आहे. यामध्ये त्यांनी तांदूळ, गहू,तेल,साखर,चहापूड, मीठ,कांदे,साबण ,तूरडाळ आदि वस्तुंचा समावेश होता अध्यक्षा उज्ज्वला चौगले यांनी असे सांगितले.
कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्वामिनी वस्तीस्तर संस्था कदमवाडी येथील संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा उज्ज्वला चौगले यांनी भागातील गरजु गोरगरीब लोकांसाठी जीवनावश्यक धान्य व किराणा मालाचे १५० किटचे वाटप केले.
यासाठी डॉ स्मिता गिरी ,उद्योजिका स्मिता लगंडे, इंनेरवील, गितांजली ठोंमके ,संयुक्ता घाडगे , दिपाली रोकडे ,अंजली गवळी ,संयुक्ता घाडगे ,सुरेखा बनसोडे ,अनिता भोसले, कविता काशिद ,नंदा थोरात ,कमल पिसे ,वंसदा नाडार , अश्विनी यादव यांचे
विशेष सहकार्य लाभले
यापुढेही कोरोनाचे संकट संपेपर्यत हे छोटेस मदतकार्य सुरुच ठेवणार असल्याचे सर्व सदस्यांनी स्पष्ट केले. महिलांना विशेषत: महिन्याचे जिन्नस पुरेसे मिळालेल की समाधान मिळते, तसेच घरातील थोड्याशा गरजा ही भागविल्या जातात म्हणून ही मदत देण्यात येत असलयाचे चौगुले व सदस्यांनी यावेळी सांगितले.