महिलांनो... मायक्रो फायनान्सच्या विळख्यातून मुक्त व्हा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:44+5:302020-12-07T04:18:44+5:30
नेसरी : मायक्रो फायनान्सचे कर्ज सर्वसामान्यांना परवडणारे नाही. सध्या या कर्जाचे सर्वांचे हप्ते थकले आहेत. मात्र, अशा कर्जाच्या नादी ...
नेसरी : मायक्रो फायनान्सचे कर्ज सर्वसामान्यांना परवडणारे नाही. सध्या या कर्जाचे सर्वांचे हप्ते थकले आहेत. मात्र, अशा कर्जाच्या नादी न लागता आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या व या भयानक व्याजाच्या मायक्रो फायनान्सच्या विळख्यातून मुक्त व्हा, असे प्रतिपादन छत्रपती शासन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दिव्याताई मगदूम यांनी केले.
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे छत्रपती शासन महिला आघाडीच्या शाखा उद्घाटनप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
मगदूम म्हणाल्या, मायक्रो फायनान्स एजंटांकडून होणारी जादा वसुली आपल्या एकजुटीने थांबवली आहे. मात्र, अशा कर्जाच्या विळख्यात न सापडता नवीन मार्ग शोधा. कोणाच्याही दबावाला बळी न पडता व अथवा घाबरून न जाता याला सामोरे जा, असे आवाहन करीत जिल्ह्यातील सुमारे १२ लाख महिला या विळख्यात सापडल्याचे त्यांनी सांगितले.
ए. ए. मगदूम यांनी महिलांना मोलाची माहिती दिली. मगदूम यांच्या हस्ते शाखाफलकाचे अनावरण झाले. उत्कर्षा नाईक यांनी स्वागत केले. जयश्री हुक्केरी यांनी सूत्रसंचलन केले. प्रतीक्षा पिटूक यांनी आभार मानले.
यावेळी समीरा दानवडे, राणीताई कोळी, स्वाती मजगवे, सुनंदा नाईक, मेघा जांबुटे, वनिता बागडी, माधुरी कुंभार, शुभांगी शिंदे, रंजना लोकरे यांच्यासह बिद्रेवाडी, बसर्गे, सुळे, अडकूर, इब्राहिमपूर, करंजगाव, हलकर्णी, हणबरवाडी येथील महिला उपस्थित होत्या.
----------------------
* फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे छत्रपती शासन महिला आघाडीचे उद्घाटन करताना जिल्हाध्यक्षा दिव्याताई मगदूम.
क्रमांक : ०६१२२०२०-गड-०९