उदगावात सशस्त्र दरोड्यात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:47 AM2017-08-15T00:47:43+5:302017-08-15T00:48:02+5:30

Women killed in armed robber in Udgat | उदगावात सशस्त्र दरोड्यात महिला ठार

उदगावात सशस्त्र दरोड्यात महिला ठार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे निवृत्त प्राध्यापकाच्या पत्नीला निर्घृणपणे ठार मारून दरोडेखोरांनी २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपयांची रोकड अशी आठ लाख रुपयांची लूट केली. अरुणा बाबूराव निकम (वय ५६) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, निवृत्त प्राध्यापक बाबूराव नारायण निकम (६३) हेदेखील दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, उदगाव-शिरोळ मार्गावर निकम मळा आहे. येथे बाबूराव, बळवंत व बंडू या तिघा भावांचे एकमेका शेजारीच तीन बंगले आहेत. यातील बाबूराव निकम हे चंद्राबाई शेंडुरे ज्युनिअर कॉलेज हुपरी (ता. हातकणंगले) येथून दोन वर्षांपूर्वी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना प्रवीण व प्रीतम ही दोन मुले आहेत. रविवारी (दि. १३) निकम कुटुंबीय प्रीतम यांच्या मुलीच्या बारशासाठी खेराटे-वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून सायंकाळी सात वाजता उदगावला परतले. दरम्यान, जेवण करून रात्री साडेनऊच्या सुमारास सर्वजण झोपी गेले.
मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी टेरेसवरुन घरात प्रवेश केला. टेरेसजवळील खोलीत प्रीतम झोपले होते. या खोलीस बाहेरून कडी लावून दरोडेखोर जिन्यातून घराच्या हॉलमध्ये आले. हॉलच्या पलीकडील बेडरूममध्ये बाबूराव यांचा मोठा मुलगा प्रवीण, त्यांची पत्नी सरिता व मुलगी प्रणिता व लहान बाळ झोपले होते. त्याही दाराला चोरट्यांनी बाहेरून कडी घातली. त्यानंतर हॉलमध्ये झोपलेल्या अरुणा यांच्यावर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने चेहºयावर वार केल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर हॉल शेजारील दुसºया बेडरूममध्ये झोपलेल्या बाबूराव निकम यांच्यावरही धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. यानंतर दरोडेखोरांनी बाबूराव यांच्या बेडरूममध्ये असलेल्या दोन लोखंडी कपाटातील दोन तोळ्यांची कर्णफुले, अडीच तोळ्यांच्या दोन चेन, तीन तोळ्यांच्या चार अंगठ्या, दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, लहान बाळाचे दोन तोळ्यांचे दागिने, तर अरुणा यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, हातातील बिलवर व पाटल्या असे एकूण २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तसेच चांदीचे दागिने व रोख पन्नास हजार, असा एकूण सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
एवढी भीषण घटना घडूनही याचा थांगपत्ता घरातील मुलांना नव्हता. सकाळी सहाच्या सुमारास बाबूराव यांचा मोठा मुलगा प्रवीण उठला असता बेडरूमला बाहेरून कडी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रवीणने पहिल्या मजल्यावरील भाऊ प्रीतमला फोन केला. तो उठला असता त्याच्याही रूमला बाहेरून कडी होती. त्यांनतर या दोघा भावांनी शेजारी असलेला चुलत भाऊ राजू निकम यास फोन करून बोलाविले. राजू यांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार थरारक प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, कोेल्हापूर गुप्तचर विभागाचे डी. एन. मोहिते, इचलकरंजी गुन्हे अन्वेषण विभागाचे शहाजी निकम, शिरोळचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्यासह शंभरहून अधिक जणांचा पोलीस फौजफाटा दाखल झाला.
पोलिसांसमोर आव्हान
घटनेचे गांभीर्य ओळखून दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असली, तरी मारेकºयांच्या शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनास्थळी आमदार उल्हास पाटील, जि. प.च्या सदस्य स्वाती सासने, माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, पं. स.चे सदस्य मन्सूर मुल्लाणी यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या.
बंगल्याची टेहळणी
बाबूराव निकम यांच्या नातीच्या बारशानिमित्त वांगी येथे निकम कुटुंबीय गेले होते. त्यामुळे दिवसभर बंगल्याला कुलूप होते. दरोडेखोरांनी बंगल्याची टेहळणी करून रात्री दरोडा टाकला असावा, अशी चर्चा होती. मात्र, घरात लोक असतानाही मारेकºयांनी निर्घृणपणे खून केला. खुनामागे आणखी काही कारण असावे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
छतालाही रक्ताचे डाग : क्रूरपणे वार
झेबा श्वान बंगल्याभोवती व शिरोळ मार्गापर्यंत घुटमळले. दरम्यान, निद्रेत असलेल्या अरुणा यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर बंगल्याच्या छतालाही रक्ताचे डाग लागले होते. त्यामुळे मारेकºयांनी क्रूरपणे ही हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Women killed in armed robber in Udgat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.